
*चिपळूण:* अज्ञात व्यक्तीने मित्राचा आवाज काढून वैद्यकीय उपचारासाठी मदत मागत सेवानिवृत्त वृद्धाची १ लाख १५ हजारांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी शनिवारी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद अरुण पुरुषोत्तम बापट (६८, मूळ-पुणे, सध्या-चिपळूण) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.१५ ते दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अरुण बापट यांच्या मोबाईलवर संपर्क करून त्या अज्ञात व्यक्तीने मित्राच्या आवाजात वैद्यकीय उपचारासाठी मदत मागत बापट यांची १ लाख १५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*

