ठाणे : दापोली येथून रोज खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या आराम बसला नायगाव – घोडबंदर रोडवर भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील एक जण जखमी झाला
मिळालेल्या माहितीनुसार, साईदत्त खाजगी आराम बसला नायगाव घोडबंदर रोडवर कंटेनरला ओव्हरटेक करताना अपघात झाला. बसमधील आणखी कुणी जखमी आहेत की नाही, याची माहिती मिळू शकलेली नाही. ही बस दररोज दापोली ते विरार या मार्गावर धावते.