प्रतिनिधी मकरंद सुर्वे, संगमेश्वर- काल (बुधवारी) सायंकाळी ठीक ५ वाजता मुंबईकडे जाणारी चार चाकी आणि कडवई या गावाकडून येणारी बाईक यामधे भीषण अपघात झाला आहे. रस्ता क्रॉस करताना समोरून येणारी बलेनो कार (MH 46 BE 3840) आणि बाईक बजाज प्लॅटिना (MH 02 bC 4851) या गाड्यांची एकमेकांना धडक बसून हा अपघात झाला आहे.
या अपघातामध्ये बाईक चालक तानाजी गुणाजी दोरकडे (रा.आंबेड खुर्द बोलेवाडी) हा गंभीर जखमी झाला असून त्यांच्या पायाला गंभीररित्या दुखापत झाली आहे. त्यावेळी सदर अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्नवाहिकेतून संबंधित जखमी चालकाला तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्नालय येथे दाखल करण्यात आले.सध्या जखमीवर उपचार सुरू असून जखमी चालकाची तब्येत स्थीर आहे.