
दापोली प्रतिनिधी – मुल विकण्याची घटना अनेक वेळी मुंबई व इतर मोठ्या शहरांमध्ये नेहमी चर्चेत असते मात्र याचा पेव कोकणात देखील पाहायला मिळतोय.
माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आर्थिक फायद्यासाठी आपल्याच ५ वर्षांच्या मुलाला विकल्याप्रकरणी एका मातेसह एका व्यक्तीविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
26/06/2025 रोजी दुपारी 12.30 वाजता गुहागर एस.टी.स्टँड समोर आरोपीत क्र. 01) अरबिना सुफियान पांजरी वय-24 वर्षे, रा. हर्णे, बाजारमोहल्ला हिने तिचा मुलगा वय-5 वर्षे, यास आर्थिक फायदयाचे उद्देशाने आरोपी सत्यवान दत्ताराम पालशेतकर वय-52 वर्षे रा.बो-या .रुळ, ता. गुहागर, जि.रत्नागिरी यांना विकले असुन सत्यवान दत्ताराम पालशेतकर याने सदर बालकाची खरेदी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास गुहागर येथील एस.टी. स्टँडसमोर हा प्रकार उघडकीस आला. आरोपी महिला हिने तिच्या ५ वर्षाच्या मुलाला आर्थिक फायद्यासाठी आरोपी सत्यवान दत्ताराम पालशेतकर (वय ५२, रा. बोऱ्या कारुळ, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) याला विकले. सत्यवान पालशेतकर याने सदर बालकाची खरेदी केल्याचे उघड झाले आहे.
या गंभीर घटनेप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५
वरिष्ठांच्या आदेशाने या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरेमठ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.