
चिपळूण : प्रतिनिधी (मंगेश घाग) रेल्वेगाडीची धडक बसून एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सावर्डे रेल्वे स्थानक परिसरात घडली. याप्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. राजेंद्र सुरेश सुवरे (मुंबई) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. सुवरे यांना सावर्डे रेल्वे स्थानक मैल दगड क्र. १४५/३५ येथे मांडवी एक्स्प्रेस या रेल्वेगाडीची धडक बसली.
जाहिरात


