दोन ट्रकच्या अपघातात एक ठार, पाच जखमी

Spread the love

संगमेश्वर :- दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर पाचजण जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर करंजारी येथे वळणावर घडली. या धडकेमुळे एका चालकाचा पाय केबिनमध्येच अडकला होता.
देवरुख पोलिस स्थानकामधून मिळालेल्या माहितीनुसार, एक ट्रक (एमएच १२ केपी ७९६३) कोल्हापूरहून जयगडकडे जात होता. त्यावर रामभाजू यादव (३८, रा. हवेली पुणे, मूळ रा. उत्तरप्रदेश) हे चालक होते. याचवेळी समोरुन येणाऱ्या ट्रकशी (एमएच ४२ बी ८९६१) त्याची जोरदार धडक झाली. सुनील गंगाराम फोंडे (३० रा. साखरपा, ता. संगमेश्वर) या ट्रकमधून लाकडे घेऊन साखरप्याकडे जात होते.
ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही चालक केबिनमध्ये अडकून पडले होते. ग्रामस्थ व पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने दोघांनाही बाहेर काढले. चालक रामभजू यादव गंभीर जखमी होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. दुसऱ्या गाडीचे चालक सुनील गंगाराम फोंडे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्या ट्रकमधील गणेश रामचंद्र बोडेकर (३३), राजेश गंगाराम रावण (३३), योगेश कृष्णा यादव (२९), सूरज सुरेश करवजे (२९, सर्व राहणार चाफवली ता. संगमेश्वर) हेही या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांना पाली येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page