📝 योगेश अरविंद मुळे – सोशल मिडिया संयोजक, भाजपा संगमेश्वर-चिपळूण विधानसभा मतदारसंघ.

▪️ भारताच्या प्राचीन ज्ञान परंपरेमध्ये आणि संस्कृतीमध्ये विश्वकल्याणाचे सूत्र सामावले आहे. ही गोष्ट संपूर्ण जगाने कित्येक शतकांपासून मान्य केली आहे. मग तो योगशास्त्राचा विषय असो, आयुर्वेदातील संस्कृत ग्रंथांमध्ये लपलेले ज्ञानाचे भांडार असो, ‘वसुधैव कुटुंबकम’ या सूत्राचा विषय असो. किंवा आपल्या पारंपारिक खाद्य पदार्थांमध्ये भरड धान्ये म्हणजेच मिलेट्सचे महत्त्व असो. ‘मन की बात’च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे सर्व विषय अभिनव पद्धतीने देशबांधवांसमोर मांडले आहेत. अशा स्वरुपात ज्यातून देशबांधवांमध्ये भारताचे ज्ञान आणि त्यांच्या परंपरांप्रती सन्मानाची नवी चेतना जागृत व्हावी, एक नवा आत्मविश्वास जागृत व्हावा जेणेकरून अत्यंत अभिमानाने भारत आपली संस्कृती मिरवू शकेल. आणि केवळ एवढेच नाही तर संपूर्ण आत्मविश्वासाने जगालाही आपल्या संस्कृतीचे महत्त्व सांगू शकेल.
🔸 “योग ने जाति, पंथ और भूगोल से परे जा कर विश्वभर के लोगों को एकजूट करने का काम किया हैं। ‘वसुधैव कुटुंबकम’ के जिस भाव को हम सदियों से जीते आये हैं हमारे ऋषी-मुनी, संत जिस पर हमेशा जोर देते आये हैं; योग ने सही मायने में उसे सिद्ध कर के दिखाया हैं।” – पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी
▪️ मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाभ्यास सर्वात उपयुक्त माध्यम आहे हे तथ्य आज संपूर्ण जगाने निर्विवादपणे मान्य केले आहे. योगाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रतिष्ठित स्थान मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पार पाडलेली अग्रगण्य भूमिका तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. मात्र त्यासोबतच योगाप्रति सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
▪️ आज देशातील प्रत्येक शाळेत आणि महाविद्यालयांमध्ये योग एक महत्त्वाचा विषय म्हणून शिकवला जात आहे. मग तो ग्रामीण भाग असो किंवा शहरी भागातील शिक्षण संस्था. योगाने आज युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी खुल्या केल्या आहेत.
▪️ सर्वांत विशेष बाब अशी, की ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी केवळ योगाला महत्त्व आणि जगाची मान्यता मिळवून दिली नाही तर योग आणि आयुर्वेदाला आधुनिक संदर्भांच्या अनुषंगाने नव्याने मांडणी करण्यासाठी भर दिला आहे. जेणेकरून ही शास्त्रे वैज्ञानिक मापदंडाच्या कसोटीवर खरी ठरू शकतील. मग ते मुंबईतील टाटा मेमोरिअल रूग्णालयात स्तनांच्या कर्करोगावरील उपचारात योगाभ्यासाच्या लाभदायक प्रभावांचा प्रत्यय असो किंवा मग दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये एकात्मिक औषधोपचार आणि संशोधन केंद्र आयुर्वेद या विषयांवर होत असलेले संशोधन असो. त्यातून समोर आलेले निष्कर्ष सगळ्या जगाला चकित करणारे आहेत.
▪️ भारताच्या प्रयत्नांतून ३१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे जगभरात लोकांच्या मनात योगाविषयी एक नवा उत्साह निर्माण झाला आहे. एवढच नाही, तर ज्या देशांमध्ये काही वर्षांपूर्वी योगशास्त्राविषयी कदाचित काहीही चर्चा होत नव्हती अशा देशांमध्येही आता मोठ्या संख्येने लोक योगाभ्यास करत आहेत. सर्वात मोठे उदाहरण सौदी अरबचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’मध्ये विशेषत्वाने सौदी अरबमध्ये योगाभ्यासाच्या वाढत्या लोकप्रियतेचा उल्लेख केला होता.
▪️ आयुर्वेदाला एक प्राचीन चिकित्सापद्धती म्हणून बहुतांश लोक ओळखतात. परदेशांतदेखील त्याविषयी अनेकविध प्रकारच्या धारणा होत्या. त्यातल्या बहुतांश प्रमाणात भ्रामक होत्या. पंतप्रधान मोदी यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर लगेचच ही धारणा बदलण्यासाठी पुढाकार घेतला. आणि या अभियानाचे माध्यम ‘मन की बात’ बनले.
▪️ पंतप्रधानांनी ‘मन की बात’मधून सातत्याने आयुर्वेदाविषयीची महत्त्वाची तथ्ये लोकांसमोर मांडली. देश आणि संपूर्ण जग जेव्हा कोविड महामारीच्या विळख्यात सापडले, तेव्हा पंतप्रधानांनी ‘मन की बात’मधून आयुर्वेदाच्या उपायांना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवले आणि या महामारीशी लढण्यास लोकांना मदत केली.
▪️ ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी सातत्याने आयुर्वेदाच्या क्षेत्रात देशभरात होत असलेल्या उत्तम प्रयत्नांचा उल्लेख केला. इतकंच नाही तर आयुर्वेदाच्या क्षेत्रात नवनव्या स्टार्ट अप कंपन्यांचा उल्लेखदेखील केला. वनौषधी शेतीच्या लाभांचा उल्लेख केला. जेणेकरून लोकांना कळू शकेल की आयुर्वेदाचा अवलंब करण्यात आरोग्यही आहे आणि आर्थिक लाभही आहे.
🔸 “आयुष इंडस्ट्री का बाजार भी लगातार बडा हो रहा हैं। छह साल पहले आयुर्वेद से जुडी दवाईयों का बाजार २२ हजार करोड रुपये के आसपास का था। आज आयुष मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री १ लाख ४० हजार करोड रुपये के आसपास पहुंच रही हैं। यानि इस क्षेत्र में संभावनाएं लगातार बड रही हैं। स्टार्ट अप वर्ल्ड में भी आयुष आकर्षण का विषय बनता जा रहा हैं।” – प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी
▪️ आयुर्वेद आणि योगाप्रमाणेच भारताच्या खाद्यपदार्थांनादेखील शास्त्रीय आधार आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या सखोल ज्ञानाच्या समजेतून वापरली जाणारी हीच खाद्यान्ने यंदा ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. भारताचे प्रयत्न आणि जगभरात भारताच्या वाढत्या प्रभावाचाच परिणाम आहे, की भारताचे पारंपारिक खाद्य असलेल्या भरड धान्याचे महत्त्व आज जगही मान्य करत आहे. ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी या मुद्द्यावर सातत्याने चर्चा करत जनजागृती केली आहे. मग भरड धान्याच्या शेतीसाठी आपली आकर्षक पगाराची नोकरी सोडणाऱ्या आंध्रच्या शेतकऱ्यांचा उल्लेख असो किंवा महाराष्ट्रातील महिला उद्योजकांचा उल्लेख किंवा मग छत्तीसगडच्या ‘विशेष भरड धान्य कॅफे’चा उल्लेख असो या सर्वांविषयी चर्चा करून पंतप्रधानांनी लोकांना अतिशय प्रेरणा दिली आहे.
▪️ उपनिषदांमध्ये ‘वसुधैव कुटुंबकम’ हे शाश्वत शब्द पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ची मध्यवर्ती संकल्पना राहिली आहे. सर्व सजीव प्राणीमात्र एकाच कुटुंबाचा अविभाज्य भाग आहेत असे समजण्याचे तत्त्वज्ञान केवळ प्राचीन भारतीय दर्शनशास्त्रात आपल्याला पहायला मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाचाही हाच महत्त्वाचा स्तंभ आहे. जेव्हा जेव्हा जगाला मोठ्या संकटांचा सामना करावा लागला आहे त्या प्रत्येक वेळी भारताने मदतीचा हात दिला आहे. मग कोविड संकटाच्या दरम्यान गरजू देशांना लस पुरवठा करणे असो किंवा तुर्कीला झालेल्या भीषण भूकंपाच्या काळात तिथल्या नागरिकांना मदत करण्यासाठी भारताने राबवलेले ‘ऑपरेशन दोस्त’ असो. भारताच्या या भूमिकेची विविध राष्ट्रप्रमुखांनी नेहमीच प्रशंसा केली आहे.
▪️ ‘वसुधैव कुटुंबकम’ हे सुवर्ण शब्द आपल्या जी-२० अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आपले बोधवाक्य ठरले आहे. देशभरात आयोजित जी-२० बैठकांमध्ये बोधचिन्हावर अंकित हे वाक्य भारताच्या वैश्विक बंधुभाव आणि शांततेविषयीची वचनबद्धता दर्शवणारे आहे.
▪️ आपल्या ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी वारंवार उल्लेख केल्याप्रमाणे परदेशी लोकांवर भारत आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा अतिशय प्रभाव आहे. भारताचा संदेश जगभर पसरवणारे जे लोक आहेत, त्यांचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला आहे. मग त्यात ऑस्ट्रेलियातील कृष्णभक्त जगत्धात्री देवी यांनी रशियात भगवद्गीतेचा संस्कृत भाषेतून केलेला प्रचार असो किंवा ब्राझिलचे जोनास मसेटी जे रिओ दि जानेरिओ येथून वेदांत आणि भारतीय तत्त्वज्ञान याविषयी आपल्या कार्यक्रमांतून माहिती देतात. त्यांचा उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या ‘मन की बात’मध्ये केला आहे.
▪️‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांचा अमेरिका निवासी कृष्णभक्त जदूराणी दासींसोबतचा संवाद मनाला स्पर्शून जाणारा होता. जदूराणी दासीजी कृष्णभक्ती रसपूर्ण, बोधयुक्त अद्भुत चित्रकलेत पारंगत आहेत.
🔸 “जदुरानी जी, मेरे पास आप के लिए अलग तरह का सवाल है। एक तरह से १९६६ से और भौतिक रूप से १९७६ से… आप भारत से लंबे समय से जुडी हुई हैं, क्या आप कृपा कर के बताएंगी की भारत आप के लिए क्या मायने रखता हैं?” – प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी
🔸 जदुरानी जी – “प्रधान मंत्री जी, भारत मेरे लिए सब कुछ हैं। मैं कुछ दिनों पहले माननीय राष्ट्रपती जी से कह रही थी की भारत तकनिकी प्रगती में इतना आगे आ रहा है और पश्चिम की तरह ही ट्विटर और इन्स्टाग्राम और आईफोन और बडी इमारतों और इतनी सुविधाएं हैं… लेकिन मुझे पता हैं की, यह भारत की असली महिमा नहीं हैं, जो बात भारत को गौरवशाली बनाती हैं वह यह हैं की कृष्ण स्वयं अवतारी यहा प्रकट हुए और सभी अवतार यहां प्रकट हुए। भगवान शिव यहां प्रकट हुए। भगवान राम यहां प्रकट हुए। सभी पवित्र नदीयां यहां हैं। वैष्णव संस्कृती के सभी पवित्र स्थान यहां हैं। और इसलिए भारत, विशेष रूप से वृंदावन, सब से महत्त्वपूर्ण स्थान हैं। वृंदावन सभी वैकुंठ ग्रामों का स्त्रोत हैं। द्वारिका का स्त्रोत हैं।”
▪️ ‘मन की बात’ हा कार्यक्रम लोकसंवादाच्या इतिहासात एक ऐतिहासिक उपक्रम म्हणून सिद्ध झाला आहे. आणि पंतप्रधानांनी याच्या माध्यमातून देशाचा वारसा, ज्ञान आणि संस्कृतीच्या प्रति देशबांधवांच्या मनात अशी ज्योत जागवली आहे, जिच्या प्रकाशात जगात शाश्वत शांती बंधुभाव आणि प्रगतीचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
साभार : DD सह्याद्री (मन की बात @ 100)