जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आंबवचा सुपुत्र प्रणय जाधव बनला पोलीस उपनिरीक्षक , रात्रंदिवस अभ्यास करून प्रणयने आपले व कुटुंबियांचे स्वप्न केले साकार….

Spread the love

देवरूख-  जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर संगमेश्वर तालुक्यातील आंबव कोंडकदमराव गावचा सुपुत्र प्रणय शरद जाधव पोलीस उपनिरीक्षक बनला आहे. रात्रंदिवस अभ्यास करून प्रणयने आपले व कुटुंबियांचे स्वप्न साकार केले आहे. प्रणय याने शेतात काबाडकष्ट करून घरीच अभ्यास करत एमपीएससी परीक्षा दिली. प्रणय याने यशाचे शिखर गाठत पोलीस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातली आहे. याबद्दल प्रणयचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
     
देवरुख-रत्नागिरी मार्गावर आंबव कोंडकदमराव गाव वसलेला आहे. याच ग्रामीण भागात प्रणय जाधव याचा जन्म झाला.पहिले ते चौथी शिक्षण आंबव येथील जिल्ह्या परिषद शाळेत, पुढील शिक्षण आश्रम शाळा निवे तर खरवते दहिवली येथील कृषी महाविद्यालयातून बीएससी अग्रीकल्चर पर्यंतचे शीक्षण घेतले. याचवेळी त्याच्या समवेत परजिल्ह्याती मित्र ही शिक्षण घेत होते. शिक्षण घेत असताना एमपीएससी परीक्षेची तयारी देखील करत होते. प्रत्येकाने अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. दररोज होणाऱ्या गप्पा गोष्टी मधून प्रणय जाधव याने एमपीएससी परीक्षा देऊन अधिकारी होण्याचा चंग मनाशी केला. प्रणय याचे वडील ग्रामपंचयातीचे निवृत्त कर्मचारी तर आई अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत आहे. घरची आर्थिक  परिस्थिती गरिबीची. आपला मुलगा अधिकारी व्हावा असे त्यांच्या आई वडिलांचे देखील स्वप्न होते.


   
प्रणय याने सन २०१८ पासून एमपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. शेती कामात आई वडिलांना मदत करून या अभ्यास सुरू ठेवला. मुंबई रत्नागिरी येथे चार वेळा परीक्षा दिल्या. ग्रामीण भागात राहून कोणत्याही अकॅडमीत न जाता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षा यशाचा झेंडा फडकवला आहे. पोलीस उपनिरीक्षक पदी त्यांची निवड झाली आहे. आई वडिलांचे स्वप्न प्रणय याने अथक मेहनत घेत पूर्ण केले आहे. यशाच्या वाटचालीमध्ये रत्नागिरी येथील राहुल शशिकांत आठल्ये यांचे मौलिक मार्गदर्शन लाभल्याचे प्रणय आवर्जून सांगतो. प्रणय याने जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासाच्या जोरावर यशाचे शिखर पादक्रांत करत तरुणांसमोर आदर्श ठेवला आहे. प्रणय याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रणय याच्या रूपाने ग्रामीण भागातील हिरा चमकला आहे.

एमपीएससी परीक्षेसाठी भरपूर खर्च येतो, अकॅडमी जॉईंट करावी लागते असा तरुणांचा समाज आहे. ह केवळ गैरसमज आहे. जिद्दीने आपण एखाद्या क्षेत्रात उतरल्यास यश दूर नाही. पर जिल्ह्यातील तरुण ध्येय डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करतात. खडतर प्रवास करतात. अपयश आले तरी खचून न जाता उभारी घेतात यामुळेच ते मोठ्या पदांवर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तरुणांनी मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता एमपीएससी, यूपीएससी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सज्ज रहा असे आवाहन प्रणय जाधव याने  केले आहे. नाशिक येथे एक वर्षे ट्रेनिंग पार पडणार आहे. यानंतर पोलीस ठाणे दिले जाणार असल्याचे प्रणय अभिमानाने सांगतो. यशाचे गमक सांगताना शेतात कष्ट करून दररोज ८ तास अभ्यास केला. कोणतीही अकॅडमीत न जाता राहुल आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परिक्षेची तयारी केल्याचे प्रणयने सांगितले. तर मेघीतील प्रभाकर  शिवराम बेटकर. आणि सर्व बेटकर परिवार, शांतिदुत सेवा मंडळ मेघी मुंबई, रत्नागिरी जिल्हा बौद्ध महासंघ, संगमेश्वर तालुका बौद्धजन सेवा संघ, बौध्दजन विकास समिती देवळे विभाग या सर्व शैक्षणिक धार्मिक सामाजिक संस्थांच्या वतीने प्रणय यांस हार्दिक शुभेच्छा. तसेच पुढिल वाटचालीत प्रगती होवो ही सदिच्छा व्यक्त करण्यात आली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page