चिपळूण : प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे, अपरान्त हॉस्पिटल चिपळूण, लायन्स क्लब चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य केंद्र कापरे येथे दिनांक ०९/०२/२०२३ रोजी आरोग्य केंद परिसरातील नागरिकांसाठी सर्व रोग निदान तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबिरात अपरान्त हॉस्पिटल चे तज्ञ डॉक्टराणी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली त्या मध्ये महिलांची संपूर्ण तपासणी महिला तज्ञ डॉक्टरांचे मार्फत तसेच दंत रोगतज्ञ, अस्थीरोग तज्ञ डॉक्टर हृदय रोग तज्ञ डॉक्टर गरज पडल्यास ईसीजी ची व्यवस्था करण्यात आली होती. वजन, उंची, रक्त दाब, रक्तातील साखरेचे प्रमाण तसेच थायरॉईड ची तपासणी करण्यात आली त्याच बरोबर मोफत लॅब च्या तपासण्या केल्या गेल्या, रक्त गट तपासणी सुद्धा करण्यात आले.सकाळी १० ते २ या वेळेत सदर आरोग्य शिबिराचे ठिकाणी 104 ग्रामस्थ व पोसरे शाळेतील 60 विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी करून घेतली.कार्यक्रम प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या मीनल काणेकर,कापरे सरपंच सुविधा कदम,गोंधळे सरपंच भूषण खेडेकर , ,भिले सरपंच अदिती गुढेकर , मालदोली सरपंच अभिदा तांबे कापरे phc चे डॉ अंकुश यादव, डॉ परशुराम निवेंडकर, डॉ राणी नागटिळक, अपरांत हॉस्पिटल चे डॉ रजनीश रेडीज, डॉ पूजा यादव, कालुस्ते येथील डॉ. कदम मॅडम श्री राजीव कांबळे, नर्स मानसी, अक्षता, आरोग्य मित्र, आरोग्य सहाय्यक श्रीम. सीमा कवठनकर कापरे आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी आशा सेविका गट प्रवर्तक उपस्थित होते.डॉ पूजा यादव यांनी महिला आरोग्य काळजी कशी घेता येते याचे मार्गदर्शन केले.अपरांत हॉस्पीटल च्या सोई सुविधा व आरोग्य दृष्ट्या दिल्या जाणाऱ्या सुविधाबद्दल सांगितले.डॉ परशुराम निवेंडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले
जाहिरात :