
मुंबई (शांताराम गुडेकर )
त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२५ व्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी मुंबई महाराष्ट्रातील आंबेडकरी युवकाच्या वतीने चेंबूर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला मेळावाचे आयोजन करण्यात आले होते.विविध क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या १२५ स्त्रियांचा मान,सन्मान करण्यात आले.पंचशील नगर,नागसेन बुध्द विहार (ग्राउंड)अमर महल जंक्शन चेंबुर टिळक नगर,पश्चिम मुंबई येथे हा सोहळा व्यवस्थितरित्या पार पडला आहे.ठाणे जिल्ह्यातील महिलांची कार्याची दखल घेत महिलांना सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले आहे.१४ गाव नवी मुंबई नारिवली गाव येथील इंटरनॅशनल ह्यूमन राईटस कमिशन महाराष्ट्र प्रदेश सचिव अंजली हरिश्चंद्र भोईर संविधान प्रचारक,ठाणे शिळफाटा येथील इंटरनॅशनल ह्युमन राईटस कमिशनच्या ठाणे जिल्हा तक्रार अधिकारी चंद्रभागा हिरा म्हात्रे,कल्याण काटेमानवली.पोलीस पाटील अपदा कार्यकर्त्या अनिता गोरख राजगुरू कल्याण नांदिवली गाव येथील पोलीस पाटील अपदा येथील कार्यकर्त्या रक्षिता मनोज ढोणे,बदलापूर येथील शाहिरा कुमारी.गार्गि रमेश कदम संविधान प्रचारक, घणसोलीच्या वंदना आरकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नवीमुंबई ग्रंथालय विभागाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा,चेंबुरच्या NDMJ च्या जेष्ठ कार्यकर्त्या रमा आहिरे,चेंबुर वाशी नाकाच्या लता अर्जुन राजगुरू, नाशिकच्या ह्युमन राईट्स विकास परिषदेच्या नाशिक जिल्हा अध्यक्ष राधा जाधव, ठाणे जिल्हा दिवा येथील कव्वालीकार.कविता पुणेकर धम्म प्रसारक,अनेक वर्षापासून ह्या १० महिलांनी अनेक गोरगरिब कुटुंबांना न्याय मिळवून दिले आहेत. बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात उंच गुणवत्तेचे उत्पादन तयार केली जातात त्यांनी २०० ते २५० महिलांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे.कोणताही दुजभाव केला नाही.या १० सिंघम महिलांचे ठाणे जिल्ह्यामध्ये कौतूक होत आहे.त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले आहे.महिला मेळावा या कार्यक्रमामध्ये एकूण १२५ महिलांचा सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
जाहिरात
