मराठी भाषा दिनानिमित्त दादर येथे मराठी भाषेबद्दल चौकात उभे राहून जनजागृती ; महाराष्ट्र संरक्षण संघटना,संलग्न मी मराठी एकीकरण समिती

Spread the love

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दादर येथे चौकात फलक घेऊन उभे राहून मराठी भाषा जतन करण्याकरीता महाराष्ट्र संरक्षण संघटना संलग्न मी मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले.

मुंबई : हल्ली मराठी लिखाणात बोलण्यात पर्यायाने वाचण्यात व ऐकण्यात असे कितीतरी इंग्रजी शब्द पाहतो ऐकतो परिणामी आपणही अधून मधून इंग्रजी शब्द बोलायला लागतो. अश्या पद्धतीने आपली माय मराठी भाषा लुप्त होत चालली आहे, शासनाच्या वतीने २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी भाषा दिन साजरा करताना असे लक्षात आले की आज आणि उद्या का साजरा करतो, तर सावरकरांनी त्या काळामध्ये इंग्रजांचे राज्य असताना आपल्या मराठी भाषेमध्ये विविध राज्यामध्ये कशी घुसखोरी झाली व ती रोखण्यासाठी भाषा शुद्धी नावाचे पुस्तक लिहले होते आणि त्यामध्ये स्पष्ट म्हटले होते आपण मातृभाषेचा प्रत्येकाने वापर केला पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा पारशी भाषेचे आक्रमण झालेलं आहे त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजभाषा वापरण्याकरीता मराठी भाषेचा कोष तयार केला होता आणि त्या अनुषंगाने आजरीत्या मराठी भाषेची काय परिस्थिती आहे की प्रत्येक मराठी माणूस बोलता बोलता ५० टक्के हिंदी आणि इंग्रजी भाषेतून बोलतो बाजारात गेल्यावर भैया कैसा दिया.थँक्स….हॅप्पी न्यू इअर…म्हणतो हे सगळे परकीय शब्द मराठी भाषेला व स्थानिक भूमीपुत्रांचा रोजगार रास्त होण्यास कारणीभूत आहेत.

मराठी भाषा टिकली पाहिजे तरच मराठी माणूस टिकेल अशी खंत दादर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या वेळी पदाधिकारी धर्मेंद्र घाग साहेब,रवींद्र राजे साहेब,अजय कदम,रवींद्र शिंदे,अविनाश गोरूले,दीप्ती वालावलकर,मयेकर साहेब,मंदार नार्वेकर, श्रीकांत मयेकर, नितीन खेतले, लहू साळवी, सुयोग पवार,

महाराष्ट्र संरक्षण संघटना,संलग्न मी मराठी एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष श्री.धर्मेंद्र घाग यांनी व्यक्त केली

जाहिरात :

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page