दिवा:- शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत दिवा शहरात बाळासाहेबांच्या धगधगत्या ज्वलंत विचारांची मशाल यात्रा काढली जाणार असल्याची माहिती दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी दिली आहे.
बाळासाहेबांनी कायमच मराठी माणसाला स्वाभिमान शिकवला असून दिल्ली श्वरांच्या समोर झुकायचे नाही ही शिकवण शिवसैनिकांना दिली आहे. दिवा शहरात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग आहे.आजही दिवा शहरातील सामान्य शिवसैनिक हे ठाकरे कुटुंबाशी प्रामाणिक आहेत.सामान्य जनतेचे प्रेम ठाकरे कुटुंबावर आहे.बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेवर घाला घालणाऱ्यांना बाळासाहेबांच्या ज्वलंत विचारांची मशाल धडा शिकवेल हा लोकांना विश्वास आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर विचार आणि स्वाभिमानी बाणा सामान्य नागरिकाला संघर्ष करण्याची प्रेरणा देत असतो. हाच विचार करून दिवा शहरात बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त १७ नोव्हेंबर रोजी दिवा शहरात मशाल यात्रा काढण्यात येणार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी सांगितले. या यात्रेनंतर बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करून मराठी माणसाच्या एकजुटीचा निर्धार केला जाणार आहे, त्याचबरोबर सामान्य शिवसैनिकांनी बाळासाहेबांना दिलेले वचन आणि बाळासाहेबांनी शेवटच्या भाषणात दिलेला आदेश लक्षात घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहण्याची शपथ यावेळी घेतली जाणार असल्याची माहिती रोहिदास मुंडे यांनी दिली.
जाहिरात
जाहिरात