
५००० पेक्षा जास्त शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी यांचा उस्फूर्त प्रतिसाद.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आमदार डॉ. राजन साळवींच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीसह राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघात जल्लोषात कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे ५ हजार पेक्षा जास्त शिवसैनिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
दरवर्षीप्रमाणे रत्नागिरी शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथील शिवसेना कार्यालय येथे श्री सत्यनारायण पूजा, रिमांड होम व वृद्धाश्रम येथे ब्लॅंकेट वाटप, दुपारी ०१ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ०४ वा. ते सायंकाळी ०७ वा. पर्यंत हळदी-कुंकू असे आयोजन करण्यात आले होते.
तसेच राजापूर तालुक्यात सकाळी १०.०० वा. शिवसेना नेते तथा आमदार डॉ. राजन साळवी यांचे हस्ते हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्हापर अर्पण, सकाळी १०:३० वा. राजापूर ग्रामीण रुग्णालय येथे फळवाटप व शिवसेनाभवन, राजापूर येथे महिला आघाडीच्यावतीने दुपारी ०३.०० वा. ते ०५.०० वा. हळदी-कुंकू आयोजन करण्यात आले होते.
लांजा तालुक्यात सकाळी १०.०० वा. शिवसेना भवन, लांजा येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. महिला आघाडीच्यावतीने शिवसेना भवन, लांजा येथे दुपारी ०३.०० वा. ते ०५.०० वा. करण्यात आले होते.
साखरपा जि.प. गटामध्ये बॅडमिंटन स्पर्धा व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सर्व कार्यक्रमांना समस्त राजापूर, लांजा व रत्नागिरीतील शिवसेना महिला आघाडी, युवासेना आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.