
संगमेश्वर : (अर्चिता कोकाटे/ नावडी )- आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे माभळे येथे विठ्ठल रखुमाई च्या मंदिरात भक्तांची अलोट गर्दी पहावयास मिळाली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये पाच दिवस कार्यक्रम असतो. यामध्ये भजन, अभंग, पालखी दिंडी इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या पाच दिवसांमध्ये घेतले जातात. यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी होते.



या कलियुगामध्ये जिथे महिला वर्ग हा सध्याच्या घडीला फेसबुक व्हाट्सअप म्हणजेच मोबाईलवर गस्त असतात तिथेच जुने संस्कार जपणाऱ्या काही महिला अजूनही प्रत्येक ठिकाणी आहेत आणि त्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. सण आला की त्या महिला मंदिरामध्ये जाऊन भजनाचा आनंद घेतात. सर्व मिळून सामुदायिक भजन करतात. संगमेश्वर माभळे येथील सर्व महिलांनी मिळून सुंदर असे विठोबाचे भजन एकत्रित म्हणून विठोबाची आराधना केली.
आषाढी एकादशी निमित्त माभळे येथे मुंबई पुणे येथून काही पाहुणे मंडळी या कार्यक्रमासाठी आलेली आहेत. तसेच माहेरवाशणी या कार्यक्रमासाठी येथे उपस्थित आहेत.
पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्रातील सर्वांचे मुख्य दैवत आणि सर्व भक्तांचा कैवारी. या विठू माऊलीचे दर्शन घेण्याकरिता पंढरपूरला ज्या भक्तांना जावयास मिळत नाही असे भक्त आपापल्या गावातील विठोबाच्या मंदिरामध्ये जाऊन मनोभावे सेवा करतात.
आषाढी एकादशी निमित्त संगमेश्वर येथील माभळे विठ्ठल रखुमाई च्या मंदिरात दर्शनास अलोट गर्दी…
आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे माभळे येथे विठ्ठल रखुमाई च्या मंदिरात भक्तांची अलोट गर्दी पहावयास मिळाली.आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये पाच दिवस कार्यक्रम असतो.
यामध्ये भजन, अभंग, पालखी दिंडी इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या पाच दिवसांमध्ये घेतले जातात. यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी होते. पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्रातील सर्वांचे मुख्य दैवत आणि सर्व भक्तांचा कैवारी. या विठू माऊलीचे दर्शन घेण्याकरिता पंढरपूरला ज्या भक्तांना जावयास मिळत नाही असे भक्त आपापल्या गावातील विठोबाच्या मंदिरामध्ये जाऊन मनोभावे सेवा करतात.