
मुंबई : महाराष्ट्र संरक्षण संघटना, संलग्न मी मराठी एकीकरण समिती कडून दरवर्षी १ मे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येतो. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी ह्या चळवळीत १०७ मराठी लोकांनी आपले हुतात्म्य पत्करले आणि मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. त्याचेच स्मरण करण्यासाठी महाराष्ट्र संरक्षण संघटना, संलग्न मी मराठी एकीकरण समिती च्या वतीने सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी देखील, फणसवाडी, गिरगाव येथील हुतात्मा सीताराम बनाजी पवार स्मारक आणि हुतात्मा बंडू गोखले मार्ग ह्याठिकाणी संघटनेच्या वतीने पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. हुतात्मा सीताराम बनाजी पवार यांचे सहकारी लाभलेले श्री. हरिभाऊ इंगळे यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले.

गिरगाव येथील कार्यक्रम झाल्यानंतर हुतात्मा चौक, फ्लोरा फाउंटन, फोर्ट याठिकाणी जाऊन हुतात्मा चौकातील स्मारकाला भेट देऊन संघटनेच्या वतीने पुष्पांजली अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. धर्मेंद्र घाग यांनी सर्वाना १ मे च्या शुभेच्छा दिल्या. तसेच बेळगाव सीमाभागातील गाव सुद्धा ह्या महाराष्ट्रात समाविष्ट झाली पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र झालेला असेल. आणि केंद्र सरकारने लवकरात लवकर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली. ह्या कार्यक्रम दरम्यान मंदार नार्वेकर,अमर कदम, रवींद्र शिंदे, रवींद्र कुवेसकर, अजय कदम, ऋषिकेश तांडेल, विवेक बुरखे, समीर मोरे, अनिल हातेकर, श्रीकांत शिंदे, उदय जागुष्टे, ननावरे साहेब, अरविंद यादव, संदेश धुरी, रुपेश भोईर, शुभम सावंत, राजेंद्र भगत, अक्षय प्रिदानकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.