मुंबई गोवा महामार्गावर ती आरवली ते तळेकांटे कॉन्ट्रॅक्टरच्या कामाचा दर्जा बद्दल उठत आहेत प्रश्नचिन्ह, कुरधुंडा येथील संरक्षण भिंतीला तडे…

Spread the love

निकृष्ट भिंतीमुळे प्रवाशांसह ग्रामस्थांचे जीवही धोक्यात!

         
गणेश पवार/ संगमेश्वर मुंबई गोवा महामार्ग टप्पा क्रमांक सहा व सात कामाच्या दर्जा बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत . मुंबई गोवा हायवे ला 14 वर्षाचा कालावधी लागला आहे . हायवे चे काम या अगोदरही अनेक तक्रारी दाखल करण्यात आलेले आहेत. परंतु राष्ट्रीय महामार्ग कोणती कारवाई करत नाही. ज्या एजन्सी ची जबाबदारी आहे त्यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. त्यांची लोकं जागेवर कधीही हजर नसतात त्याचाच एक नमुना म्हणजे कुरधुंडा येथील भिंतीला गेलेले तडे आहेत.बेजबाबदार ठेकेदारांच्या निकृष्ट कामाचा उत्तम नमुना संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा येथील मुंबई गोवा महामार्गावर समोर आला आहे.

ग्रामपंचायत तिने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली लेखी निवेदनाने चौकशीची मागणी…

कुरधुंडा येथे येथे उभारलेल्या भल्यामोठ्या संरक्षण भिंतीला तडे गेले असून ही भिंत कोणत्याही क्षणी कोसळण्याची श्यक्यता आहे.दुर्दैवाने ही भिंत कोसळली तर मोठी दुर्घटना होऊन प्रवासी तसेच स्थानिक ग्रामस्थांचे जीव धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली असून येथील ग्रामपंचायतीने या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून दादा मागितली आहे.या संदर्भात कुरधुंडा ग्रामपंचायतीने थेट जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे दाद मागितली आहे. ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन संबंधित संरक्षण भिंतीची परिस्थिती तसेच उद्भवणारा धोका याकडे लक्ष वेधले आहे. सदर विषयाची चौकशी व्हावी आणि कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामपंचायतीने करण्यात आलेली आहे.तसेच या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची व संबंधितावर कारवाईची मागणी केली आहे.तसेच या धोकादायक बनलेल्या संरक्षण भिंतीवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.आता जिल्हाधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे येथील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे..

हुजूर आणि सब कॉन्ट्रॅक्टर जे मात्रे कंट्रक्शन कंपनी लोकांशी जीवनाशी अशी करत आहेत खेळ…

मुंबई गोवा महामार्ग संदर्भामध्ये अनेक बैठका आजपर्यंत झाल्या हुजूर कंपनीने कॉन्ट्रॅक्ट दिलेले जे एम म्हात्रे कंट्रक्शन कंपनीकडून कोणत्याही मिटींगला हजर राहत नाहीत. अधिकाऱ्यांच्या सूचना ही मानत नाहीत. कामासंदर्भामध्ये कोणते प्रश्न विचारल्यास त्याला कोणतीही उत्तर देत नाहीत. आज पर्यंत डिपारमेंटनी पाठवलेल्या पत्रालाही जे म्हात्रे कडून कोणती उत्तरे देण्यात आलेली नाहीत. यावरून कॉन्ट्रॅक्टर किती निर्दयी मनाचा आहे हे दिसून येते. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर वर त्वरित कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे. आजपर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम गेले कित्येकवर्षं सुरू असून निकृष्ट कामाची अनेक उदाहरणे यापूर्वी समोर आलेली आहेत. परंतु सुस्त प्रशासन आणि उदासीन लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ठेकेदार यंत्रणा मुजोर होऊन इतकी सुस्त झाली आहे की झोपेतून जागे होण्याची मानसिकताच ते विसरून गेले आहेत. साहजिक स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांच्या जीवाशी त्यांना काहीही देणेघेणे राहिलेले नाही. महामार्गावरील खड्डे,चिखलमय झालेले रस्ते, रस्त्यावर साचलेले पाणी,चुकीचे डायव्हरशन यामुळे रोज अपघात होत असताना देखील सहज दुर्लक्ष होत असल्याने ठेकेदाराला एक प्रकारे रान मोकळे झाले आहे अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.

भिंत बाहेरील बाजूस सरकत असून प्रशासनाचे दुर्लक्ष  ….
 
 
संगमेश्वर मध्ये तर प्रवासी व ग्रामस्थांना अत्यंत भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागत असतानाच आता कुरधुंडा येथे भीतीदायक असा प्रकार समोर आला आहे.कुरधुंडा येथील हजरत इशामुद्दीन दर्गा समोर महामार्गाला सुमारे १०० मीटरहुन अधिक लांबीची संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे.वर्षभरापूर्वी उभारलेल्या या संरक्षण भिंतीची आज ची परिस्थिती तर भीतीदायक आहे.या भल्यामोठ्या भिंतीला तडे गेले असून एका बाजूने ही भिंत बाहेरच्या दिशेला सरकत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.त्यामुळे ही भिंत कोणत्याही क्षणी कोसळण्याची श्यक्यता आहे.परंतु अद्यापही याकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष गेलेले दिसत नाही.

       
भिंत कोसळली तर जबाबदारी कोणाची?

दुर्दैवाने जर ही भिंत कोसळली तर मात्र मोठी दुर्घटनेला येथे सामोरे जावे लागणार आहे.भिंतीच्या समोरच दर्गा असून येथे रोज भावीक येत असतात.तसेच दर्गेत व आजूबाजूच्या शेतात व लोकवस्तीत जाण्यासाठी पूर्वीपासूनचा रस्ता असल्याने वाहन तसेच पादचारी वर्दळ असते.तसेच धोकादायक झालेल्या भिंतीला लागूनच राष्ट्रीय महामार्ग असून या  महामार्गावरून वाहनांची येजा सतत सुरू आहे,आशा परिस्थितीत जर का भिंत कोसळली सरकली  तर न भरून येणारी मोठी हानी होण्याची श्यक्यता आहे.त्यामुळे स्थानीक ग्रामस्थ,भाविक व महामार्गांवरून ये -जा करणाऱ्या  प्रवाशांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साहजिकच या प्रशासन व ठेकेदार कंपनीने याची त्वरित दखल घेण्याची गरज आहे.परंतु मुर्दाड ठेकेदार यंत्रणेकडून कोणती अपेक्षा करावी असा संताप स्थानिकाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

राष्ट्रीय महामार्गाचे इंजिनीयर ऑफिसमध्ये बसून काम जागेवर जाऊन कामाची पाहणी न केल्यामुळेच भिंतीला तडे…

राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी यांच्याकडे यापूर्वीही तक्रारी दाखल करण्यात आले आहेत. सदर तक्रारी मध्ये साई एजन्सी यांचे काम डिझाईन नुसार काम करून घेणे व त्याच्या दर्जा तपासणी आहे. तर राष्ट्रीय महामार्गाने झालेले काम योग्य प्रकारे होत आहे की नाही याची पाहणी करण्यासाठी त्यांचे इंजिनियर यांचे काम आहे. परंतु साई एजन्सीची गाडी यांचे इंजिनियर ऑफिसला जाण्यासाठी वापरतात. याची लेखी तक्रारही देण्यात आलेली आहे. परंतु संबंधित इंजिनियर वर आजपर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही. राष्ट्रीय महामार्ग विभाग कॉन्ट्रॅक्टर किंवा साई एजन्सीवर कोणती कारवाई करत नाही त्यामुळे देवाण-घेवाण झाल्याचे संशय निर्माण होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाने आपला बालिशपणा सोडून साई एजन्सी कॉन्ट्रॅक्टर व आपल्या विभागातील इंजिनियर वर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

गेल्या महिन्याभरामध्ये अनेक ठिकाणी हायवेवर अपघात व निकृष्ट काम आले पुढे परंतु कारवाई नाहीच…

गेल्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक घटना घडल्या आहेत. त्यामध्ये आरवली मध्ये गटाराला पडलेले भगदाड, त्यामुळे होणारा नागरिकांना त्रास हे दिसून आले आहे. संगमेश्वर बाजारपेठेमध्ये चिखलाचे साम्राज्य, वांद्रे येथे सोमेश्वर मंदिर आमच्याकडे ची भिंत कोसळणे, अनेक ठिकाणी मुंबई गोवा हायवे चा वाहून गेलेला भराव, निवळी येथील झालेला अपघात, आणि आज रोजी समोर आलेला भिंतीला तडे गेलेल्या चा विषय यावरून जे एम म्हात्रे कंट्रक्शन कंपनीचे काम किती निकृष्ट दर्जाचे आहे हे पुढे आले आहे. करोडो रुपयांची कामे मिळूनही कंपनीच्या कामाबद्दल दर्जा उपस्थित होणे म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग विभागाची हलगर्जीपणा यामध्ये दिसून येत आहे. कॉन्ट्रॅक्टर ची माणसे ग्रामस्थांना कोणत्याही सहकार्य करत नाहीत. याउलट नागरिकांना दमदारटी करतात अशी अवस्था आज झालेली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page