
*मुंबई-* महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सोमवारपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाने सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत लक्ष वेधून घेतले. यावेळी विरोधी पक्षाचे अनेक नेते हे विधानभवनाच्या पायऱ्यांवर मी मराठी ही टोपी घालून बसले होते.
विधानभवनाच्या सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार ‘मी मराठी’ टोपी घालून दाखल झाले. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मी मराठी असे लिहिलेली टोपी घालून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर आदित्य ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात हस्तांदोलनही झाले. तसेच भास्कर जाधव आणि अजय चौधरी हे देखील मी मराठी असे लिहिलेली टोपी घालून उपस्थित होते. तर दुसरीकडे विधानसभेत आज मुख्यमंत्र्यांनी नवनिर्वाचित मंत्री छगन भुजबळ यांचा परिचय करून दिला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश पटलावर ठेवला जाणार आहे. तसेच २०२५-२६ च्या पुरवणी मागण्याही सादर केल्या जातील. शोक प्रस्ताव मांडल्यानंतर आजचे कामकाज संपणार आहे.