
*श्रीकृष्ण खातू / धामणी-* आंतरराष्ट्रीय महिला दिन आपण दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा करतो या दिवशी विविध क्षेत्रातील महिलांच्या योगदानाची आठवण केली जाते. महिला.. स्त्री संबंधित विषय समस्यावर लक्ष दिले जाते. त्यांचे हक्क, महिला दिनाचा उद्देश, सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश अंब्रे , संजय शिंदे अमृता शेट्ये , जनार्दन शिरगावकर हे आपल्या रोजच्या व्यापातून वेळ काढून स्वखर्चाने समाजातील सेवाभाव जपून गोरगरिबांसाठी महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असतात.अशा काही महिलांचा जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राहुल कोकाटे यांच्या निवासस्थानी येतोच ची सन्मान करण्यात आला.



संपूर्ण वर्षभर येथील महिलांचा हा ग्रुप जनजागृती, मनोरंजन, सांस्कृतिक, व सणांचा वारसा, परंपरा जोपासण्यासाठी, महिला दिन कार्यक्रम, श्रावण उत्सव, मंगळागौर स्पर्धा, घटस्थापने निमित्त कर्तुत्वान महिला आदिशक्तींचे विचार, हळदी कुंकू समारंभ व त्याचे महत्त्व, मेंदी काढणे स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गरजूंना मदत करणे अशा प्रकारे आपले कुटुंब, संसार सांभाळून अशी कामे करत असतात.
प्रत्यक्षात महिला दिनी अशा महिला अनेक कार्यक्रमात व्यस्त असतात. त्यामुळे त्यांची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे राहून जाते. परंतु अशा महिलांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे यासाठी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी आपली परंपरा व समाजाचे देणे लागतो हे कर्तव्य जोपासत ५० ते ६० महिलांना एकत्र करून महिला दिनाच्या अगोदर एक दिवस हा कार्यक्रम घडवून आणला.



संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस भगिनी योगिता बरगाळे, क्रांती सावंत यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी योगिता बरगाळे यांनी महिलांची होणारी डिजिटल फसवणुक, येणारे फेक मेसेज, तसेच अनोळखी येणारे फोन,फसव्या योजना, याला महिलांनी बळी न पडता अशी शंका आल्यास आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधा व कायदा सुरक्षा आदीबाबत माहिती मिळवून घ्या अशा प्रकारचे मार्गदर्शन केले.
तसेच उपस्थित असणारे श्रीकृष्ण खातू यांनी महिला दिनानिमित्त काही उदाहरणे देऊन महिला दिनाची सुरुवात, महत्व, का साजरा केला जातो,यावर आधारित सखोल मार्गदर्शन पर माहिती दिली. संजय शिंदे यांनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रतिष्ठित दादा कोळवणकर, मुरकर, श्वेता खातू, अमृता शेट्ये , जनार्दन शिरगावकर, योगिनी डोंगरे, नेहा रेडीज, नम्रता शेट्ये, सानिका कदम, प्रिया सावंत, सुविधा शेट्ये, शितल अंब्रे अर्चिता शेट्ये, सविता हळदकर,आर्या मयेकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिनेश अंब्रे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संजय शिंदे अमृता शेट्ये , शिरगावकर दिनेश अंब्रे यांनी परिश्रम घेतले.