
संगमेश्वर प्रतिनिधी- पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा होत आहे. या निमित्त भाजपा रत्नागिरी मध्य मंडळ अध्यक्ष श्री. प्रतीक देसाई आणि भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिण यांच्या माध्यमातून ग्रामिण रुग्णालय संगमेश्वर* येथे *फळवाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा रत्नागिरी दक्षिणच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे, महिला जिल्हा सरचिटणीस सौ. नुपुरा मुळ्ये यांनी तेथील महिला रुग्णांची चौकशी केली, त्यांना आपल्या मातृवंदना योजनांची माहिती दिली. यावेळी तालुका सरचिटणीस श्री. राजेश आंबेकर, उपाध्यक्ष श्री. सतीश पटेल, श्री. मंगेश साळवी, श्री. अनुप प्रसादे, श्री. विक्रांत लोध, उपाध्यक्षा सौ. सुमन झगडे, सौ. रोहिणी सुर्वे, सौ. वर्षा खंडकर, सुदीक्षा जठार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

