रायगड : अ.पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली,यांच्या वतीने, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्ताने रायगड जिल्हा परिषद शाळा डिकसल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी शिबिरासाठी 70 ते 75 नागरिक व तरुणांनी सहभाग घेतला, या वेळी माधव बाग स्पेशालिस्ट डॉ.बन्सीलाल पाटील, डॉ विशाल बनसोडे(CHE), डॉ सूरज शर्मा, अविनाश गुप्ता, कु. डॉ अंकुर, कु. प्रतीक्षा,कु,काजल, आदी उपस्थित होते, या वेळी अ. पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली, या संघटनेच्या राष्ट्रीयअध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर साळोखे यांच्या वतीने महा पुरुषांना दीप प्रज्वलन करून, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे यांच्या हस्ते भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले डॉ बन्सीलाल पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री मनोहर कदम यांच्या महा पुरुषांना वंदन करून माहिती व मार्गदर्शन करण्यात आले,
यावेळी शिबिरामध्ये १) ईसिजी(Ecg) २) रक्तातील साखरेची तपासणी ३) सिबिसी (CBC),४)spo2 ,बीपी,PR/RA 5)मोफत डोळे तपासणी ,चष्मा वाटप.6) बाकी अजारांवर्ती विनामुल्ये मार्गदर्शन, या वेळी परिसरातील ,75/80 नागरिकांनी शिबिरास हजेरी लावून लाभ घेतला .या वेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, राष्ट्रीय सचिव हरेश हेमानी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री मनोहर कदम, महाराष्ट्र कोर कमिटी, श्री रतन लोंगळे, श्री उत्तम ठोंबरे, श्री सिप्रेश साळोखे, तालुका सचिव प्रफुल जाधव, श्री. सुभाष ठानगे, सेल अध्यक्ष शांताराम मिरकुटे,कु शेखर लोंगळे,, श्री नंदकुमार जाधव, श्री, संजय साळोखे, आदी उपस्थित होते….