भारतीय जनता पार्टी प्रभात क्र १९२ तर्फे “सरकार आपल्या दारी..! श्री. दिपकजी केसरकर व श्री. कालिदास कोळंबकर यांचे जनतेशी सुसंवाद..!

Spread the love

महेश कदम मुंबई प्रतिनिधी- मुंबईतील जनतेसाठी सरकार आपल्या दारी या कार्यकर्मा-अंतर्गत दि: २ जून २०२३ रोजी महानगर पालिकेच्या जी उत्तर प्रभाग मा. ना. श्री. दिपकजी केसरकर साहेब यांचे जल्लोषात स्वागत केले. मा. कार्यसम्राट आमदार श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र १९२ मधील जनतेला भेडसावणाऱ्या पुढील समस्याचे वितरण करण्यात आले.
1) विभागातील पाणी समस्या.
2) अपंगत्व आलेल्या लोकांना शिक्षण व इतर सरकारी लाभ आणि सुविधा.
3) मलनिसरण लाईन समस्या.
4) रेल्वे लगत झोपडपट्टी रहिवाशी पुनर्वसन.
5)विभागातील गरीब हातावरील पोट असलेल्या फेरीवाल्यांची समस्या.
6) जुन्या व मोडकळीस तसेच धोकादायक इमारतींचे पुनर्वसन.

इत्यादी विषयांवर सखोल चर्चा करून यातील काही प्रश्न तांत्रिक बाबींच्या आधारावर सोडवून जनतेच्या प्रश्नाला न्याय मिळाला. सोबत श्री. जितेंद्र कांबळे, श्री.अनंत (दादा) शिर्सेकर, श्री. संदीप तिवरेकर, श्री. राजू (भाई) सावला व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. यात मा. ना. श्री दिपकजी केसरकर साहेब पालकमंत्री मुंबई. व मा. कार्यसम्राट आमदार श्री कालिदास कोळंबकर साहेब यांचे जाहीर सत्कार व आभार करण्यात आले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page