ठाणे : कुणबी समाज नेते आणि कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या समाजाच्या बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक सन्माननीय श्री . अशोकजी वालम साहेब आणि अध्यक्ष श्री . प्रेमनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ” राम गणेश गडकरी रंगायतन , ठाणे येथे दिनांक २५ मार्च , २०२३ रोजी भव्य ” कुणबी उद्योजक प्रोत्साहन परिषद २०२३ चे आयोजन करण्यात आलेले आहे . या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय मुख्यमंत्री सन्माननीय श्री . एकनाथजी शिंदे साहेब , उद्योग मंत्री सन्माननीय श्री . उदयजी सामंत साहेब अन्य पीछडा बहुजन कल्याण मंत्री सन्माननीय श्री . अतुलजी सावे साहेब , कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे अधक्ष सन्माननीय श्री .भूषणजी बरे साहेब हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत .सदरची परिषद सकाळी ०९.०० ते ०२.०० वाजता च्या दरम्यान होणार आहे .
कुणबी समाज हा फार मोठ्या प्रमाणात असूनही तो आर्थिक दृष्ट्या फारच मागासलेला आणि विखुरलेला आहे .
समाजातील व्यवसायिकांना एका सक्षम व्यासपीठावर आणून समाजाला आर्थिक व व्यवसायिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या संस्थे मार्फत अनेक शासकीय योजना राबविण्याचे काम या संस्थे मार्फत केले जाते . या संस्थेला अल्पावधीतच मुबई , मुंबई उपनगरे , संपूर्ण कोकण , पालघर , ठाणे , कल्याण -डोंबिवली ,शहापूर आणि पुणे परिसरातील कुणबी बांधवांनी उदंड प्रतिसाद दिला आहे .
समाजाला उद्योग व व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करणे आणि त्यातूनच सामजिक , सांस्कृतिक , शैक्षणिक , पारंपरिक शेती / आधुनिक शेती , वैद्यकीय आणि क्रीडा क्षेत्रात समाज क्रांती घडविण्याचे काम या संस्थे मार्फत करण्यात येणार आहे . कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेत समाजातील दिग्गज , लहान मोठे व्यवसायिक / उद्योजक तसेच नव व्यवसायिक मोठ्या संख्येने सभासद झालेले असून त्यांना व्यवसायिक मार्गदर्शन मिळावे या साठीच ही कुणबी उद्योजक प्रोत्साहन परिषद २०२३ चे आयोजन करण्यात आलेले आहे .
आज महाराष्ट्रात अनेक उच्चशिक्षित तरुण , तरुणी नोकरी नसल्याने बेकार आहेत . नोकर बनून राहण्यापेक्षा मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार या युक्तीने जास्तीत जास्त समजतील तरुण आणि तरुणीने उद्योग / व्यवसायात खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन संस्थे मार्फत करण्यात येत आहे . संस्था त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहील असे आश्वासन संस्थेचे अध्यक्ष श्री . प्रेमनाथ ठोंबरे यांनी दिले आहे . समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तर समाजाच्या प्रगतीला कोणीही थांबवू शकणार नाही याची खात्री संस्थेच्या अध्यक्षांना आहे . ही परिषद कुणबी समाजासाठी खुली असल्याने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री . प्रेमनाथ ठोंबरे व सचिव सन्माननीय ॲड . श्री . अजय पाटील यांनी केले आहे .