रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर विन्हेरे ते दिवाणखवटी दरम्यान दरड कोसळून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने रत्नागिरी स्थानकात अडकून पडलेल्या तेजस तसेच जनशताब्दी एक्सप्रेसमधील प्रवाशांना जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यामार्फत चहा, नाश्ता तसेच जेवणाच्या किटची व्यवस्था करण्यात आली. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकात अडकलेल्या गाड्यांमधील प्रवाशांना हे वाटप करण्यात आले.
कोकण रेल्वे मार्गावर खेड नजीक दिवाणखवटी रेल्वे बोगद्याच्या तोंडावर रविवारी सायंकाळी चार वाजून 48 मिनिटांच्या सुमारास पावसामुळे दरड कोसळली. या घटनेनंतर वेगवेगळ्या स्थानकांमध्ये रेल्वे गाड्या रोखून ठेवण्यात आल्या. त्यामध्ये मडगाव येथून मुंबईला जाणाऱ्या तेजस तसेच जनशताब्दी एक्सप्रेसना रत्नागिरी रेल्वे स्थानकात रोखून ठेवण्यात आले.
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना या दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर गाड्यांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांची माहिती घेतली. गाड्यांमधील लहान मुले, प्रवासी यांची गैरसोय होऊ नये याच्यासाठी जेवणाचे किट, चहा नाश्ता तसेच लहान मुलांसाठी दूध आणि बिस्किटे देण्याची व्यवस्था केली. यासाठीचा सर्व खर्च पालकमंत्री उदय सामंत यांनी केला. रेल्वे गाड्यांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांच्या संदर्भात प्रसंगावधान राखून पालकमंत्री उदय सामंत यांनी यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी रेल्वे स्थानकावर धाव घेतली. तिथे प्रवाशांची होत असलेली घरचे लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या जेवण, चहा, नाश्त्यासह चहा बिस्किटाची व्यवस्था केली. रेल्वे गाड्यांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांनी या मदतीसाठी कृतज्ञता व्यक्त केली.