
मुंबई : कोकणातील ग्रामसंस्कृती चे दर्शन आणि जपुया गावचे गावपण वर अतिशय लोकप्रिय होत असलेले धमाल विनोदी नाटक आता उठवू सारे रान चा प्रयोग यावेळी दादर शिवाजी नाट्यगृह , प्लाझा सिनेमा समोर दादर पश्चिम मुंबई येथे रविवारी दिनांक 30 एप्रिल 2023 सकाळी 10.30 वाजता होणार आहे, गाव भावकि तसेच समाजातील राजकारणातील सद्य स्थितीत होणाऱ्या वास्तववादी घडामोडीचा मागोवा घेत हे नाटक कोकणातील पर्यटन आणि स्थलांतर वर परिणामकारक भाष्य करते, आपसात , सार्वजनिक जीवनात होणारे समज गैरसमज, वाद विवाद आणि त्यातुन युवा पिढीने उचलेली परिवर्तनाची निर्णायक पाऊले आणि होणारे बदल लोकांना नाटक प्रचंड आकर्षित करीत अल्पवावधीत लोकप्रिय होत आहे,

गावात समाजात आपसात लोकांनी वाद विवाद टाळून सलोख्याने बंधुत्व जपून राजकीय सूडबुद्धीची मानसिकता बाजूला ठेऊन सहकार्यची भावना जपावी यासाठी कलेच्या माध्यमातून बोध घेण्यासाठी या नाटकाचे आयोजन केले आहे, येऊ घातलेल्या ग्रामपंचायत आणि विधानसभा सभा निवडणूक च्या वातावरनात लोकांनी काय भान ठेवले पाहिजे या जागृतीसाठी हे नाटक लोकांनी पाहावे , नुसते पाहून नाही तर तसा त्यांनी विचार करावा या भावनेने नाटक आयोजित केले आहे असे प्रतिनिधीशी बोलताना अनंत फिलसे यांनी सांगितले, लेखक दिग्दर्शक सुनिल माळी आणि आता उठवू सारे रान ची कलाकार तंत्रज्ञ टीम ने साकारलेली ही नाटयकलाकृती कोकणातील प्रत्येक गावाने पहावी अशी आहे.