८ आणि ९ एप्रिलला मिरज येथे राष्ट्रीय स्तरावरील शरीर सौष्ठव स्पर्धेचा थरार रंगणार

Spread the love

मुंबई (प्रतिनिधी)  अमेच्युर बॉडी बिल्डिंग असोसिएशन  फिसिक स्पोर्ट्स फेडरेशन इंडिया आणि महाराष्ट्र राज्य हौशी शरीर सौष्ठव संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई प्रो टीमच्या वतीने “३री राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धा २०२२-२०२३” आयोजित करण्यात आलेली आहे. मुंबई प्रो बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे संस्थापक आणि महाराष्ट्र राज्य हौशी शरीर सौष्ठव संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत परब यांच्या संकल्पनेतून हि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा प्रथमच महाराष्ट्रात आयोजित करण्यात आली आहे. 

दिनांक ८ आणि ९ एप्रिल रोजी मिरज, सांगली येथे होणाऱ्या या स्पर्धेत संपूर्ण भारतातून १५० हुन अधिक पुरुष व महिला शरीर सौष्ठवपट्टू सहभागी होणार आहेत. स्पर्धेत जिंकणाऱ्या विजेत्यांकरिता ६ लाखाहून अधिकचे रोख पारितोषिक आणि इतर आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत. या सर्व शरीरपट्टूमधून “भारत सर्वश्रेष्ठ हा किताब विजेत्यास देण्यात येईल त्या व्यतीरीक्त ७ विविध किताब विजेत्यांस देण्यात येतील.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या शरीर शौष्ठवाचे प्रदर्शन करून कौतुक मिळवावे ह्या प्रेरणेने वेड लागलेले शरीर सौष्ठवपट्टू वर्षानुवर्षे सातत्याने व्यायाम करतात, महागाईची परवा न करता प्रसंगी कर्ज काढून, घरातील मौल्यवान वस्तू गहाण ठेवून नियमित पौष्टिक प्रथिनयुक्त आहार घेतात व त्यांना मंचावर दिलेल्या केवळ एकच मिनिटाच्या अवधीत सर्व कस लाऊन आपल्या शरीर सौष्ठवाचे प्रात्यक्षिक दाखवितात. एवढ्या समर्पणा नंतरही बक्षीस नाही मिळाले तरी खचून न जाता पुढील स्पर्धेच्या तयारीला लागतात.या सर्व खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे.

अधिक माहिती साठी या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करा.नारायण पूजारे  ८२८६५०३०४०, सुशील मनास  ८३६९०९०२१०.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page