
नांदेडच्या ओमकेश जाधव यानं यशाचं शिखर गाठलं आहे. त्यानं जिद्द आणि मेहनतीच्या बळावर क्लास वन पोस्ट कमावली आहे.
नांदेड : स्वप्न साकार करण्यासाठी जिद्द, मेहनत आणि संयम लागतो, हे नांदेड शहरातील ओमकेश जाधव या तरुणानं सिद्ध करून दाखवलं आहे. शासकीय सेवेत कार्यरत असतानाही अधिकारी बनण्याचं त्याचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यानं अथक मेहनत केली. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून क्लास वन अधिकारी म्हणून सेवेत सामील होण्याचा मान मिळवला. विशेष म्हणजे, ओमकेशनं एक-दोन वेळा नाही, तर सहावेळा एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
ओमकेशचा उद्देश गरिबांचं जीवनमान सुधारणं :
ओमकेशचं यश हे केवळ त्याच्या वैयक्तिक करिअरसाठी नाही, तर समाजातील वंचित, उपेक्षित आणि गोरगरीब लोकांसाठी योगदान देण्याच्या ध्येयानं प्रेरित असल्याचं तो सांगतो. ओमकेशचा उद्देश फक्त अधिकारी बनणं नव्हे, तर समाजातील जनतेच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणं आहे. आज त्याचं यश स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. कारण त्यानं दाखवून दिलं आहे की, मेहनत आणि ध्येयाच्या जोरावर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.
नांदेडचा ओमकेश जाधव झाला क्लास वन अधिकारी..ओमकेश सध्या उपशिक्षण अधिकारी :
ओमकेश जाधव हा नांदेड शहरातील सिडको भागातील रहिवासी आहे. त्याचे वडील उत्तमराव जाधव हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ओमकेश सध्या हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयात उपशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
ओमकेशनं स्पर्धा परिक्षांचे क्लास लावले नाहीत :
लहानपणापासूनच त्याचं मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न होतं. त्यानुसार, 2019 पासून त्यानं स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पुणे शहरात एकटा राहून, कुठलेही क्लासेस न लावता त्यानं अखंड मेहनत केली. 2020 मध्ये त्याने एमपीएससी परीक्षा दिली. परंतु त्याला अपेक्षित यश मिळालं नाही. त्याचा 126 वा रँक आला. यामध्ये त्याला शासकीय सेवेत संधी मिळाली नाही, तरीही त्यानं खचून न जाता प्रयत्न सुरू ठेवले.
सहावेळा स्पर्धा परीक्षा देऊन उत्तीर्ण-
ओमकेशच्या अथक प्रयत्नांचा परिणाम 2021 मध्ये दिसला. तेव्हा त्याची कामगार अधिकारी पदावर निवड झाली. त्यानंतर, 2022 मध्ये त्याची उपशिक्षण अधिकारी पदावर निवड झाली. 2023 आणि 2024 मध्येही तो यशस्वी ठरला. पाचव्या प्रयत्नातही त्याची हिंगोली जिल्ह्यात उपशिक्षण अधिकारी म्हणून निवड झाली. त्याच वेळी 2024 मध्ये त्यानं प्रशासकीय अधिकारी परीक्षेत राज्यात 54वा रँक मिळवला. एकूण सहावेळा स्पर्धा परीक्षा देऊन ओमकेश प्रत्येकवेळी उत्तीर्ण झाला. भविष्यात गट विकास अधिकारी, जीएसटी विभागात सहायक आयुक्त किंवा उद्योग उपसंचालक पदावर काम करण्याची संधी मिळेल, असा त्याचा विश्वास आहे.
ओमकेश जाधव शालेय शिक्षण नायगाव तालुक्यात :
ओमकेशचं प्राथमिक शिक्षण नायगाव तालुक्यातील जनता हायस्कूलमध्ये झालं. त्यानंतर, पुढील शिक्षणासाठी त्यानं नवोदय विद्यालयात प्रवेश घेतला. इथूनच त्याचा शालेय शिक्षणाचा मार्ग पुढे सरकला. उच्च शिक्षणासाठी ओमकेशनं पुणे येथील डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन आपलं इंजिनिअरिंग पूर्ण केलं.
ओमकेशच्या यशात आई-वडिलांचं मोठं योगदान :
ओमकेशला या यशाच्या मार्गावर नेहमीच आई-वडिलांचं प्रोत्साहन आणि सहकार्य मिळालं. त्याचे वडील उत्तमराव जाधव आणि आई सुमन जाधव यांचं त्याच्या आयुष्यात मोठं योगदान होतं. आपल्या मुलाला अधिकारी बनवण्यासाठी त्यांनी कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. प्रत्येक टप्प्यावर त्याला आवश्यक ते सर्व पाठिंबा दिला. त्याच्या यशामुळे कुटुंबातील आई-वडिलांचा आनंद द्विगुणित झाला आहे. मुलानं यशाचं शिखर गाठल्यामुळे त्यांचं स्वप्न साकार झालं. त्यांना कष्टाचं फळ मिळाल्याची त्यांची भावना आहे. ओमकेशच्या कर्तृत्वाचं सर्व स्तरांवर कौतुक होत आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*