प्रतिनिधी: विनोद चव्हाण
नालासोपाराच्या पावन भूमीत अनेक थोर संतांच्या ओव्यांआधारित भजन स्पर्धेचे आयोजन ओम साई भजन मंडळ यांनी १६ वा वर्धपन दिन सोहळ्या निमत्त भव्य दिव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे दिप प्रज्योलन राजन नाईक यांच्या हस्ते करण्यातले.
विठ्ठल नामाच्या गजरात अवघा परिसर भक्तीमय झालेला पाहायला मिळाला, याचं नालासोपाऱ्याच्या मातीत रुचकर आणि सुरमधुर अशी भजन संस्कृती उदयास आली! अशा मनोवेधक भजन संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी ओम साई भजन मंडळाने रविवार दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी १६ वा वर्धपन दिन सोहळ्यानिमत्त भव्य दिव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ओम साई भजन मंडळाची स्थापना २००८ साली झाली या रेल्वे प्रवाशी मंडळ मध्ये विविध राज्याच्या भागातील आलेले एकूण ४० सभासद आहेत. संत परंपरा जपताना स्वतःच्या कुटुंब सोबत गेली ९ वर्षे सहपरिवार पंढरपूर तसेच विविध ठिकाणच्या यात्रा करतात, विविध रेल्वे प्रवासी भजन स्पर्धेत सुंदर गायकी, शिस्तबद्ध भजन, उत्कृष्ट डफली बदक अशी कित्येक बक्षीस या मंडळाने प्राप्त केली आहेत.
भजनांची सुरवात मनोज साटम आणि अशोक मेत्री यां माऊलीनी केली आहे. तसेच मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. शंकर माळी आहेत, त्यांच्या खांद्याला खांदा लावून मंडळाला लाभलेले गायक मनोहर साळवी बुवा तसेच त्यांना साथ देयाला त्याचे डफली वादक मयुर सावंत आणि नरेश साळवी, सुधाकर बाईत, वैभव रांजणे, संदीप चव्हाण, गौरव गाडे, गायक सुदर्शन शिगवण, योगेश येलये, अमित पवार आणि सर्व कार्यकारणी यांनीच म़डळाच नाव उंच शिखरावर नेऊन ठेवल आहे.
या कार्यक्रमाला धनंजय गावडे यांनी उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन केले. भजन स्पर्धेचे परीक्षक म्हणून बुवा अरुण राणे, बुवा अनंत शेनॉय आणि पखवाजवादक उदय आयरे यांच्या निरीक्षणात प्रथम क्रमाक प्रमोद कुळये बुवा, द्वितीय क्रमाक आवड हरी नामाची, तिसरा क्रमाक विठ्ठल मयेकर यांना मिळवला तसेच बुवा अरुण राणे आवाजात वैष्णव घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ ही भैरवी घेण्यात आली, कार्यक्रमाचे दिवसभराचे सूत्रसंचालन महेश कदम यांनी केले.