
पुणे , 25 जुलै – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात ते श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने करणार आहेत. यावेळी मंदिर प्रशासनाकडून पंतप्रधानांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोदींच्या हस्ते बाप्पाची महाआरती आणि अभिषेक करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी नुकतीच पुण्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराची पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार आणि पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार हे देखील उपस्थित होते. १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे.