भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष, माजी उप नगराध्यक्ष अभिजीत शेटये आणि भाजपा प्रणित रिक्षा संघटना अध्यक्ष प्रमोद शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन केली होती मागणी
संगमेश्वर: अनेक वर्ष प्रलंबित असलेली संगमेश्वर तालुक्यातील देवरुखच्या रिक्षा व्यावसायीकांची अधिकृत रिक्षा स्टँडची मागणी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पूर्ण केली आहे.काही दिवसांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन रिक्षाव्यवसायिकांची ही अडचण दूर करण्याची मागणी केली होती. पालकमंत्री महोदयांनी त्याची दखल घेत तातडीने रिक्षा स्टँड मंजुरी देण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. आता त्याबाबतची अधिकृत मंजुरी प्राप्त झाली.
• एसटी स्टँड ते वेल्हाळ कॉम्प्लेक्स – १० रिक्षा.
• अपना बाजार समोर – १० रिक्षा.
• माणिक चौक – १० रिक्षा.
• मातृमंदिर चौक – ५ रिक्षा.
देवरुख मधील वरील चार ठिकाणी अधिकृत रिक्षा स्टॅन्ड ची मंजुरी प्राप्त झाली आहे.
गेल्या अनेक वर्षापासूनची प्रलंबित असलेली रिक्षाव्यवसायिकांची मागणी मंजुर झाल्याने रिक्षा स्टॅन्डच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणारे भाजप ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष व माजी उप नगराध्यक्ष अभिजीत शेटये आणि भाजपा रीक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रमोद शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. रिक्षा व्यवसायिकांनी देखील पालकमंत्री उदय सामंत यांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.
जाहिरात
जाहिरात