
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतागृहाची दुर्गंधी दूर करण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी लेखणी ऐवजी झाडू हातात घेतली, गांधीगिरीमुळे प्रशासक खडबडून जागे
जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतागृहाच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले होते. याबत बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या मात्र प्रशासनाने याची दखल घेतली नाही. शेवटी मराठी पत्रकार परिषदेने आज हातातील लेखणी बाजूला ठेवत हातात झाडू घेतली व स्वच्छातागृह साफ केली. हा उपक्रम सुरु करताच प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हाधिकारी, तहसीलदार पासून सर्व यंत्रणा धावत आली. पत्रकारांनी हातात झाडू घेतल्याचे पाहताच दिलगिरी व्यक्त करीत यापुढे स्वच्छते साठी वेगळी यंत्रणा नेमली जाईल व यापुढे असे चित्र दिसणार नाही असे आश्वासन दिले दिले.
जाहिरात

जाहिरात

जाहिरात
