✍️ जनशक्तीचा दबाव न्यूज
🛑 ओडिसा | जानेवारी २९, २०२३.
▪️ एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या गोळीबारात ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा किशोर दास यांचे निधन झाले आहे. नाबा किशोर दास ब्रजराजनगरमध्ये एका कार्यक्रमाला जात असतानाच पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात ते गंभीर जखमी झाले होते.
▪️ मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नाबा किशोर दास रविवारी झारसुगुडा जिल्ह्यातील गांधी चौकात एका कार्यक्रमासाठी आले होते. तेथे त्यांची गाडी थांबली असता कार्यकर्त्यांनी त्यांना हार घातला. तितक्यात पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्या छातीवर गोळी झाडली. गोळी लागल्याचे कळताच दास पुन्हा गाडीत बसले आणि पुन्हा बाहेर आले. यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली.
▪️ पोलीस अधिकाऱ्याने नाबा दास यांच्यावर ५ राऊंड फायर केले होते. गोळी लागल्यानंतर दास यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे.