मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणचे ‘चिपलुन” व पेणचे ‘पेन” असे नामफलक
चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावरील अनेक भागातील रखडलेल्या चौपदरीकरण कामांमुळे महामार्ग चर्चेत ‘आलेला असतानाच महामार्गावरील मैलांच्या दगडावरील शहरांची नावे चुकीच्या पद्धतीने लिहून मराठीची मोडतोड करण्यात आल्याने पुन्हा नव्या चर्चेची भर पडली आहे.
चिपळूणचे ‘चिपलुन” व पेणचे ‘पेन” असे नामफलक लिहिल्याने मराठीची शुध्दता लोप पावली असल्यासारखे वाटत आहे. काही दिवसांपूर्वीच गुढीपाडव्यांच्या निमित्ताने मराठी नववर्षाचे स्वागत करत असताना मैलाच्या दगडावर करण्यात आलेली मराठीची मोडतोड ही खेदाची बाब असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
महाराष्ट्राची अस्मिता असणारी मराठी भाषा व तिचे संवर्धन हे सर्वांचेच कर्तव्य. असतानाही राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना याचे काहीच सोयरसूतक असल्याचे दिसून येत नाही. मराठी भाषेविषयी इतकी संवेदना मरावी, ही अत्यंत खेदाची बाब आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याने ही बाब गंभीरपणे घेवून चुकीची दुरूस्ती त्वरित करून मराठी भाषेचा अभिमान राखावा, असेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे एरवी मराठीचा उदो उदो करणारे लोकप्रतिनिधी देखील याबाबतीत गप्प आहेत
पथकराविषयी माहिती देणारा ओसरगाव येथील फलक