महिला लोकशाही दिन 20 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी
रत्नागिरी : प्रतिनिधी (कल्याणी मोरे)
जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात “जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन ” साजरा होतो. यावेळी अर्जदार महिला स्वतः उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात व त्यानुषंगाने जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकारी यांना महिलांचे वैयक्तिक प्रश्नाबाबत कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात. त्याप्रमाणे माहे फेब्रुवारी २०२३ रोजी चा महिला लोकशाही दिन सोमवार २० फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत आयोजित केला आहे.
रत्नागिरी जिल्हयाची भौगोलिक स्थिती लक्षात घेता ज्या महिलांना लोकशाही दिनास प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही, अशा महिलांच्या सोयीच्या दृष्टीने, “रत्नागिरी जिल्हयातील महिलांना प्रायोगिक तत्वावर फोनव्दारे संपर्क करुन दि. २० फेब्रुवारी २०२३ रोजीच्या महिला लोकशाही दिनात जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या १०७७ या टोल फ्री क्रमांकावर दुपारी १२ ते १ वाजता या वेळेत त्यांचे निवेदन/ अर्ज नोंदविता येतील, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समिती, रत्नागिरी यांनी कळविले आहे.
जाहिरात :