रत्नागिरी: माळनाका स्कायवॉक व्हर्टिकल गार्डनच्या विरोधात आता मनसे देखील आक्रमक झाली आहे
सोमवार दिनांक २४ जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी शहर पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत माळनाका स्कायवॉक येथे होऊ घातलेल्या व्हर्टिकल गार्डन प्रकल्पाला मनसेतर्फे विरोध दर्शवला आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात काही वर्षांपूर्वी सुमारे दोन कोटी खर्चून उभारलेल्या स्कायवॉकच्या उपयोगीतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत, रत्नागिरीत आधीच असलेले बागबगीचे उद्याने यांची अवस्था व प्रलंबित असलेले अनेक प्रश्न दुर्लक्षित करून पुन्हा एकदा याच ठिकाणी पर्यटन विकासाअंतर्गत २६ लाखांचा निधी खर्चून व्हर्टिकल गार्डन उभारून नागरिकांच्या कररूपी पैशांचा अपव्यय करण्याचा घाट घातला जाणार असेल,तर मनसेचा याला तीव्र विरोध असेल असेल नमूद करण्यात आले आहे
यावेळी शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की मनसे चा विरोध कोणत्या विकासकामास नसून नागरिकांच्या कररूपी पैशांचा अपव्यय करण्याला आहे.
पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून निधी खर्च करायचा असल्यास अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत त्याकडे
नगरपरिषदने लक्ष द्यावे
उदा. रत्नागिरीतील अनेक पर्यटनस्थळी असलेल्या स्वच्छतागृहांची स्थिती कशी सुधारता हे पहावे असे त्यांनी म्हटले आहे
यावेळी मनसे शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, शहरसचिव अजिंक्य केसरकर, उपशहरअध्यक्ष गौरव चव्हाण, महिला उपशहरअध्यक्ष शिल्पाताई कुंभार,विभाग अध्यक्ष दिलीपकाका नागवेकर,मनसे रस्ते आस्थापना विभाग तालुका संघटक सतीश खामकर,मनविसे शहरअध्यक्ष तेजस साळवी,अनंत शिंदे,यश डोंगरे, तन्मय साळवी आदी
महाराष्ट्रसैनिक-पदाधिकारी उपस्थित होते.