आता Driving Licence शिवाय चालवता येणार गाडी !!! सरकारने सुरु केली ‘ही’ सुविधा

Spread the love

Driving Licence : कोणतेही वाहन चालवण्यासाठी आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. जर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर आपल्याला मोठा दंड भरावा लागू शकेल. मात्र आता आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स जवळ नसतानाही गाडी चालवता येईल. होय, आता असे करणे शक्य आहे.

कारण आता ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) सोबत ठेवण्याची गरज भासणार नाही. यासाठी डिजिलॉकरचा वापर करता येईल. हे जाणून घ्या कि, देशात डिजिटलायझेशनला चालना देण्यासाठी सरकारकडून डिजीलॉकरची सुविधा सुरु करण्यात आली आहे. ज्यामध्ये आपल्याला लायसन्स, गाडीचे रजिस्ट्रेशन यांसारख्या अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी ठेवता येतील. तसेच हे सगळीकडे व्हॅलिड देखील असेल. जे दाखवल्यानंतर आपल्याकडून कोणताही दंड अथवा कारवाई केली जाणार नाही.

इलेक्ट्रिक बाईक चालवत असाल तर…

हे ध्यानात घ्या कि, इलेक्ट्रिक बाईक चालवण्यासाठी फक्त शिकाऊ परवान्याची गरज असते. मात्र जर आपल्याकडे नॉन-गिअर वाहनाचे लायसन्स असेल तरी देखील इलेक्ट्रिक बाईक चालवता येईल. मात्र याव्यतिरिक्त इतर कोणतेही वाहन चालवण्यासाठी आपल्याकडे दुचाकी किंवा चारचाकी वाहनाचे पक्के लायसन्स (Driving Licence) असणे आवश्यक आहे.
लायसन्स नसेल तर…
जर आपण लायसन्स नसतानाही गाडी चालवत असाल तर पोलिसांकडून आपले वाहन जप्त केले जाऊ शकेल. यासोबतच 2 हजार ते 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकेल. तसेच जर आपल्याकडे लायसन्स (Driving Licence) असेल तर आता डिजीलॉकरच्या मदतीने त्याची सॉफ्ट कॉपी ठेवता येईल. तसेच जर कधी पोलिसांकडून अडवणूक झाली तर ही सॉफ्ट कॉपी दाखवून सुटका करून घेता येईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.mahatranscom.in/

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page