आता आधार अपडेटसाठी पैसे द्यावे लागणार नाही; सरकारचा मोठा निर्णय

Spread the love

नवी दिल्ली : जर तुमचे आधार कार्ड १० वर्ष जुने असेल तर तुम्हाला ते अपडेट करणे आवश्यक आहे. प्रत्येक १० वर्षांनी आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य असून यंदा तुम्हाला तुमचा आधार अपडेट करायचा असेल तर तुम्हाला एक पैसाही खर्च करण्याची गरज नाही. सरकारने देशातील कोट्यवधी जनतेला मोठा दिलासा दिला आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांना आधारसाठी ऑनलाइन दस्तऐवज अपडेट करण्याची सुविधा मोफत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता तुम्हाला आधार अपडेट करण्यासाठी एकही पैसा खर्च करावा लागणार नाहीत. मात्र, ही सुविधा ऑनलाइन अपडेट करण्यासाठीच मिळेल आणि ते देखील फक्त तीन महिन्यांसाठी.

आधारकार्ड धारक जर त्यांचे आधार अपडेट करण्यासाठी फिजिकल काउंटरवर गेल्यास त्यांना पैसे भरावे लागतील. UIDAI ने सांगितले की आधार धारक तीन महिन्यांसाठी मोफत आधार अपडेट सुविधेचा लाभ मिळेल. आधार कार्ड धारक १५ मार्च २०२३ ते १४ जून २०२३ पर्यंत त्यांचे आधार कार्ड ऑनलाइन मोफत अपडेट करू शकतात.

आधार अपडेटसाठी किती खर्च
सध्या आधार कार्डात कोणत्याही प्रकारचे अपडेट करण्यासाठी तुम्हाला ५० रुपये शुल्क भरावा लागतो. तसेच आधार केंद्रावर जाऊनही दस्तऐवज अपडेट करण्यासाठी ५० रुपये शुल्क भरावे लागायचे. यापूर्वी, आधार पोर्टलवर कागदपत्रे अपडेट करण्यासाठी रहिवाशांना २५ रुपये शुल्क द्यावे लागत होते. तर ऑनलाइन आधार अपडेट करण्यासाठीही शुल्क आकारले जात होते. पण आता ही प्रक्रिया विनामूल्य करण्यात आली आहे. अशा स्थितीत सरकारच्या या सवलतीचा फायदा आधार कार्डधारक घेऊ शकतात.

आधारचे महत्त्व
लक्षात घ्या की सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. जर तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून तुमचे आधार कार्ड अपडेट केलेले नाही तर तुम्हाला सरकारच्या या निर्णयाचा चांगलाच फायदा होईल. कारण आता आधार अपडेट करणे खूप सोपे झाले असून तुम्ही घरबसल्या देखील UIDAI वेबसाइटवर जाऊन काही मिनिटांत तुमचे आधार अपडेट करू शकता. मात्र, यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी नोंदणीकृत असला पाहिजे. त्यानंतरच तुम्ही या ऑनलाइन सुविधेचा लाभ घेऊ शकता.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page