आता देशभरात १० आणि ११ एप्रिल रोजी मॉक ड्रील होणार

Spread the love

महाराष्ट्र : देशामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचं संकट वाढत आहे. आज नव्याने ६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेले आहेत. त्याच अनुषंगाने आता देशभरात १० आणि ११ एप्रिल रोजी मॉक ड्रील होणार आहे.केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आज राज्यांतील आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी मॉक ड्रीलबद्दल माहिती दिली.
कालच्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसामध्ये कोरोनाचे ५ हजार ३३६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशामध्ये आतापर्यंत संक्रमित रुग्णसंख्या ४ कोटी ४७ लाख ३९ हजार ५४ इतकी झाली आहे. मागच्या १९५ दिवसांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या वाढलेली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page