नवी दिल्ली : आधारकार्ड आणि मतदान कार्ड यांच्या जोडणीसाठी 1 एप्रिल 2023 ची मर्यादा देण्यात आली होती. ही मर्यादा आता 31 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या संदर्भातील सूचना केंद्र सरकारने मंगळवारी जारी केली आहे
.केंद्रीय विधी मंत्रालयाने आधार आणि निवडणूक कार्डाची जोडणी ही ऐच्छिक असेल आणि त्यासाठी मतदाराची परवानगी गरजेची आहे असे जाहीर केले होते. निवडणूक आयोगाने या दोन कार्डांच्या जोडणीची मोहीम सुरू केली असून मतदार यादीतील नावे योग्य आहेत अथवा नाही हे निश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. डिसेंबर 2021 मध्ये लोकसभेत निवडणूक कायद्यात बदलासाठीचे विधेयक मंजूर करण्यात आले होते. या विधेयकाच्या मंजुरीमुळे आधार आणि मतदानासाठीचे कार्ड यांच्या जोडणीला अधिकृत करण्यात आले होते.