रत्नागिरी: जिल्ह्यातील ज्या निवृत्तीवेतन धारकांना रत्नागिरी जिल्हा कोषागाराकडुन निवृत्तीवेतन प्रदान केले जाते अशा सर्व निवृत्तीवेतन धारकांना कळविण्यात येते सन २०२३-२०२४ पासून नविन आयकर प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. तरी जे निवृत्तीवेतन धारक आयकर कपातीस पात्र आहेत (ज्यांचे वार्षिक निवृत्तीवेतन रुपये सात लाखपेक्षा अधिक आहे, असे निवृत्तीवेतनधारक) अशा निवृत्तीवेतनधारकांचे नियमानुसार आयकर कपात त्यांचे निवृत्तीवेतनातुन माहे मे २०२३ पासून सुरु करणेत येईल, याची नोंद घेण्यात यावी.
ज्या निवृत्तीवेतनधारकांना जुनी आयकर प्रणाली स्वीकारावयाची आहे, त्यांनी चालु आर्थिक वर्षासाठी (सन २०२३-२०२४) केलेल्या गुंतवणुकीच्या तपशिलासह जुनी आयकर प्रणाली स्वीकारणेबाबतचा लेखी अर्ज जिल्हा कोषागार कार्यालयाकडे त्वरीत सादर करावा. सदर तपशिल सादर न केल्यास, नियमानुसार आयकर कपात त्यांचे निवृत्तीवेतनातुन करणेत येईल. निवृत्तीवेतनधारकांनी आपली आयकर माहिती तात्काळ कोषागारास सादर करून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालय, रत्नागिरी मार्फत करण्यात येत आहे.