केवळ अयोध्याच नाही, तर भगवान श्री रामाची ‘ही’ मंदिरेही आहेत खूप प्रसिद्ध; एकदा अवश्य भेट द्या
भगवान विष्णूचा अवतार म्हणून ओळखल्या जाणार्या श्री रामाची लोक खूप मनोभावाने पूजा करतात. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यात झाल्याचे सांगितले जाते. अयोध्येत श्रीराम जन्मभूमी असल्याने, तेथे भव्य राम मंदिर उभारले जात आहे. ज्याच्या बांधकामाचे काम पुढील वर्षापर्यंत पूर्ण होणार आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर पुढील वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी पुन्हा एकदा येथे भगवान रामची स्थापना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अयोध्येतील श्री रामजन्मभूमीला भेट देण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात. या मंदिराबद्दल जवळपास सर्वांनाच माहिती आहे. पण, तुम्हाला माहित आहे का, की श्री रामजन्मभूमी व्यतिरिक्त भारतात अशी अनेक मंदिरे आहेत जिथे श्रीराम वास करतात. या मंदिरात पूजा केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते असे म्हणतात. चला या मंदिरांबद्दल जाणून घेऊया.
केरळचे त्रिप्रयार मंदिर
हे मंदिर केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात आहे. श्रीकृष्णाने येथे श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली होती, असे मानले जाते. केरळच्या चेट्टुवा भागातील एका मच्छिमाराने याची स्थापना केली होती. यानंतर शासक वक्काइल कॅमलने त्रिप्रयारमध्ये या मूर्तीची स्थापना केली. असे म्हणतात की येथे येणाऱ्या भाविकांना दुष्ट आत्म्यांपासून मुक्ती मिळते.
नाशिकचे काळाराम मंदिर
काळाराम मंदिर हे पंचवटी, नाशिक, महाराष्ट्र येथे आहे. येथे श्रीरामाची २ फूट उंच काळ्या रंगाची मूर्ती बसवण्यात आली आहे. वनवासात भगवान श्रीराम माता सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासमवेत पंचवटीत राहिले असे सांगितले जाते. हे मंदिर सरदार रंगारू ओढेकर यांनी बांधले होते. त्यांना स्वप्न पडले की गोदावरी नदीत श्री रामाची काळी मूर्ती आहे. जी त्यांनी दुसऱ्या दिवशी बाहेर काढून मंदिरात स्थापित केली.
तेलंगणाचे सीता रामचंद्रस्वामी मंदिर
श्री रामाचे हे मंदिर भद्राचलम, भद्राडी कोठागुडेम, तेलंगणा येथे आहे. हे मंदिर तेथे आहे, जेथे भगवान सीतेला लंकेतून परत आणण्यासाठी गोदावरी नदी ओलांडले होते. या मंदिरात भगवान राम धनुष्यबाणांसह त्रिभंगाच्या रूपात विराजमान आहेत.
एमपीचे राम राजा मंदिर
मध्य प्रदेशातील ओरछा येथे स्थित मध्यप्रदेशचे राम राजा मंदिर हे एकमेव असे मंदिर आहे, जिथे भगवान श्री राम यांची राजा म्हणून पूजा केली जाते. येथे दररोज गार्ड ऑफ ऑनर देऊन, प्रभू श्री रामाला शस्त्रास्त्र सलामी दिली जाते.