नूडल्स आणि रव्याचे इन्स्टंट डोसे, १० मिनिटांत गरमागरम डोसा तयार! पाहा रेसिपी…

Spread the love

आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या घरात सकाळच्या नाश्त्याला इडली, डोसा, मेंदू वडा असे दाक्षिणात्य पदार्थ केले जातात. हे पदार्थ सांबार, चटणी सोबत खायला अतिशय चविष्ट लागतात. नाश्त्याला असे दाक्षिणात्य पदार्थ करायचे म्हणजे त्यासाठी सर्वात आधी डाळ, तांदूळ भिजवण्यापासूनची तयारी करावी लागते. डाळ व तांदूळ यांचे योग्य गणित जमले तरच असे पदार्थ बनवायला सोपे जाते. हे पदार्थ तयार करताना डाळ व तांदूळ यांचे प्रमाण चुकले तर सगळा पदार्थच फसतो. प्रामुख्याने डोसा बनवायचा म्हटला तर तो छान मऊ किंवा जाळीदार आणि कुरकुरीत असलेलाच चांगला लागतो. डोसा तयार करायचा म्हणजे डाळ, तांदूळ भिजवून मग त्याचे पीठ वाटून घ्यावे लागते. हे वाटून घेतलेले पीठ रात्रभर आंबवत ठेवावे लागते.

आपण काहीवेळा डोशाचे पीठ घरीच बनवतो किंवा बाहेरून विकतचे पीठ आणून त्याचे डोसे करतो. बरेचदा आपल्याला कामाच्या गडबडीत डोशासाठी डाळ, तांदूळ भिजत घालणे, त्याचे पीठ तयार करणे यासाठी इतका वेळ नसतो. अशा परिस्थितीत, जर घरच्या घरी डोसा बनवायचा झाला तर नेमकं काय करायचं हा प्रश्न पडतो. अशावेळी डोशाचे पीठ तयार करण्यापेक्षा आपण झटपट घरातील इन्स्टंट नूडल्स वापरून त्याचे पीठ तयार करून मस्त कुरकुरीत डोसे तयार करू शकतो. इन्स्टंट नूडल्सचे चटकन डोसे कसे तयार करता येतील याची सोपी कृती पाहूयात

साहित्य :- 

१. नूडल्स  – १ पाकीट २. पाणी – १ कप ३. मीठ – चवीनुसार ४. मसाला – १ टेबलस्पून ५. तेल – १ टेबलस्पून ६. कोथिंबीर – १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)७. रवा – १ टेबलस्पून 

कृती :- 

१. सर्वप्रथम, नूडल्स बेस्डचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावे.२. आता हे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात एक चमचा बारीक रवा घालून या दोघांची बारीक पूड होईपर्यंत वाटून घ्यावे. ३.नूडल्स बेस्ड मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर करून घ्यावी, त्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी घालावे. ४. या मिश्रणात पाणी घालून झाल्यानंतर परत एकदा हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्यावे. ५. आता हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले पीठ एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावे

६. हे मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर त्यात गरजेनुसार मीठ घालूंन हे मिश्रण चमच्याच्या मदतीने ढवळून घ्यावे. ७. एका पॅनमध्ये चारही बाजुंनी तेल सोडून मग त्यावर या तयार बॅटरचे गोलाकार डोसे घालून घ्यावे. ८. पॅनमध्ये गोलाकार डोसा घातल्यानंतर त्यावर थोडेसे तेल सोडावे. ९. या डोशावर थोडासा नुडल्स मसाला भुरभुरवून घ्यावा तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. १०. आता या पॅनवर झाकण ठेवून २ ते ३ मिनिटे हा डोसा मंद आचेवर शिजवून घ्यावा

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page