मागणी करूनही दुसरा शिक्षक नाही,
चोरवणे शाळेत ‘शाळा बंद’ आंदोलन

Spread the love

संगमेश्वर :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोरवणे येथे शिक्षक देण्याची ग्रामस्थ्यांची मागणी शिक्षण विभागाकडून वारंवार डावलण्यात आली. त्याविरोधात चोरवणे ग्रामस्थांनी ‘शाळा बंद’ आंदोलन पुकारले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोरवणे तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथील एक शिक्षक यादव हे आजारी असून योग्य पद्धतीने सेवा देऊ शकत नसल्याने त्यांच्या ऐवजी दुसरे शिक्षक देण्याची ग्रामस्थ्यांची मागणी शिक्षण विभागाकडून वारंवार डावलण्यात आली. त्याविरोधात चोरवणे ग्रामस्थांनी ‘शाळा बंद’ आंदोलन पुकारले आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि संबंधित अधिकारी यांनी योग्य ती कार्यवाही करावी व विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

जाहिरात


Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page