मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार; नितीन गडकरी यांनीच सांगितले पहा सविस्तर….

Spread the love

रायगड : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी प्रथमच गोवा मुंबई द्रुतगती महामार्गाचे विलोभनीय फोटो शेअर केले आहेत. त्यांनी या महामार्गाची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यांबरोबरीने पाहणी केली. त्यानंतर या मार्गाच्या कामाच्या प्रगतीचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. अपूर्ण राहिलेल्या कामांसंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यामुळे या महामार्गाच्या कामास वेग येणार असून लवकरच मुंबईवरुन सुसाट गोव्याला जाता येणार आहे. सध्य्या 586 किमीच्या या मार्गावरुन जाण्यासाठी ११ तासांचा अवधी लागतो.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ची राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी पाहणी केली. भूसंपादन प्रक्रिया, भूसंपादन मोबदला वाटपातील विलंब व वन्य जमिनीच्या मंजुरीस झालेला विलंबामुळे हे काम वेळेत पूर्ण होवू शकले नाही, परंतु सर्व अडचणींवर मात करून हे काम आता प्रगतीपथावर आहे, असे नितीन गडकरी यांनी ट्विट करत म्हटले आहे.

दहा भागांमध्ये केली विभागणी


राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत मुंबई-गोवा महामार्गाची इंदापूर ते झारप या भागांतील १० पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या १० पॅकेजेसची एकूण सुधारित किंमत १५ हजार ५६६ कोटी रुपये आहे. ३५६ किमी लांबीच्या महामार्गावरील २५० किमी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याचे गडकरी यांनी सांगितले. उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.comवर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा
भ्रमणध्वनी क्र.९८१९९४६९९९/८९२८६२२४१६

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page