
रत्नागिरी: अफवा पसरवू नका जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा आवाहन
अवैधरित्या गुरांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. आरोपी पकडण्यात आला आहे रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतही कारवाई करण्यात आली आहे. आज दापोली येथेही 28 गुरांची वाहतूक करताना पकडण्यात आले आहे.
या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र या संदर्भात कोणीही जिल्ह्यात अफवा अथवा चुकीचे मेसेज पसरवत असेल आणि पोलिसांच्या तसे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा थेट इशाराच जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिला आहे.