
मुंबई : देशात झपाटय़ाने वाढणाऱ्या ‘इन्फ्लुएंझा’ विषाणूने दोन जणांचा बळी घेतल्यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.केंद्र सरकारने नीती आयोगासोबत तातडीची बैठक घेतल्यानंतर नीती आयोगाने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. शिवाय सर्दी, खोकला आणि ताप अशी कोणतीही लक्षणे असल्यास काळजी घ्यावी, असा खबरदारीचा इशाराही नीती आयोगाकडून देण्यात आला आहे.