
संगमेश्वर प्रतिनिधी– जिजाऊ फाउंडेशन च्या वतीने रत्नागिरी मध्ये गोरगरीब जनतेसाठी मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले . जिजाऊ फाउंडेशन संस्थापक श्रीमान निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी जिल्ह्यासाठी खास गोरगरीब जनतेच्या रुग्णसेवेसाठी विशेष म्हणजे आपल्या वडिलांच्या नावाने जागतिक पितृ दिनाच्या निमित्ताने रुग्णसेवा करण्याच्या दृष्टीने सुसज्ज अशा मोफत आरोग्य सेवा करण्याच्या दृष्टीने रुग्णालय लोकार्पण सोहळा नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला.
त्यानिमित्ताने संगमेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर विकास संस्थेचे चेअरमन संतोष जूवळे, असुर्डे ग्रामपंचायत उप सरपंच कृष्णकांत डावळ, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सोलकर, आंबेडचे सामाजिक कार्यकर्ते बोले, चंद्रकात बाईत यांनी जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरगरिबांचे कैवारी श्री निलेश सांबरे यांना धन्यवाद। देऊन पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या.