राजापूर : शहरातील मुख्य रस्त्यालगत राजापूर हायस्कुल नजीक असलेल्या पवार इलेक्ट्रॉनिक्स आणि ओम ऑनलाईन अँड अकाउंटिंग सर्व्हिसेस सेंटरला 5 जुलै रोजी आकस्मिक लागलेल्या आगीत ही दोन्ही दुकाने जळून खाक झाली होती. यात या दोन्ही व्यावसायिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. या दोन्ही कुटुंबीयांना माजी खासदार निलेश राणे यांनी आर्थिक मदत करून मदतीचा हात दिला आहे. पवार व साने कुटुंबीयांवर ओढवलेल्या या दुदैवी प्रसंगानंतर त्यांना राजापुरात येऊन प्रत्यक्ष भेटून त्यांना यातुन सावरण्यासाठी राणे यांनी मदतीचा हात देत धीर दिल्याने पवार व साने कुटुंबीयांनी राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
भाजपाच्या प्रदेश महिला सचिव सौ. शील्पा मराठे यांनी नुकतेचे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय उद्योग मंत्री ना. नारायण राणे यांची भेट घेऊन पवार व साने यांच्या दुकानांना आग लागून झालेल्या नुकसानीबाबत ना. राणे यांना माहिती दिली होती. यावेळी सौ. मराठे यांनी या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी असे निवेदनही ना. राणे यांना दिले होते. याची तातडीने दखल घेत ना. राणे यांनी या दोन्ही आपदग्रस्त कुटुबीयांना मदतीचा हात दिला आहे. सोमवारी राजापूरात येत निलेश राणे यांनी या दोन्ही कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांना आर्थिक मदत सुपुर्द केली. तुंम्ही पुन्हा नव्या जोमाने आपले व्यवसाय उभारा, यासाठी काहीही मदत लागली तरी संपर्क साधा असा धीरही निलेश राणे यांनी यावेळी या दोन्ही कुटुंबीयांना दिला. पवार यांच्या गाडगिळवाडी येथील निवासस्थानी जाऊन संजय पवार यांना तर साने यांच्या दुकानाजवळ येऊन केदार व केतन साने यांना राणे यांनी ही मदत दिली. तर साने यांचे वडील नारायण साने यांच्याशीही राणे यांनी संवाद साधून धीर दिला.
याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, महिला प्रदेश सचिव सौ. शील्पा मराठे, भाजपा सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, तालुका अध्यक्ष अभिजित गुरव, लांजा तालुका अध्यक्ष महेश उर्फ मुन्ना खामकर, प्रा. मारूती कांबळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. शृती ताम्हनकर, सौ. शीतल पटेल, सौ. सुयोगा जठार, तालुका सरचिटणीस मोहन घुमे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष जब्बार काझी, अरवींद लांजेकर, संदेश आंबेकर, अमर वारीशे, प्रसाद पळसुळेदेसाई, समिर शिंदे, माजी नगरसेवक नागेश शेटये, धनंजय उर्फ दादा मराठे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.