चौके शाखेच्या एटीएम सेंटरचे माजी खासदार मान.निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण
सिंधुनगरी/प्रतिनिधी:- अतिशय धडाडीने, कल्पकतेने आणि वेगाने काम करणारे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचे नेतृत्व पाहता जिल्हा बँकेची प्रगती राज्यात नव्हे तर देशात एक नंबर ठरणार असल्याचा विश्वास रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार निलेश राणे यांनी जिल्हा बँकेच्या चौके शाखेच्या एटीएम सेंटरचे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
गरीबांचे प्रगतीचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सहकार क्षेत्राने केले- केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह….
https://janshaktichadabav.com/union-home-and-cooperatives-minister-amit-shah-has-done-the-work-of-cooperative-sector-to-fulfill-the-dream-of-progress-of-the-poor/
अचुक बातम्यांसाठी संकेतस्थळाला भेट द्या
https://janshaktichadabav.com/
दबाव न्यूज च्या व्हॉट्सॲप समूहात 🪀 सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…
https://chat.whatsapp.com/LVk4F8vIMNH3EJ7OMBLP66
✍🏻 दबाव जनशक्तीचा, निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा
यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी चौके गावातील ग्रामस्थांकडून वारंवार एटीएम् सेंटरची मागणी होत होती. याबाबत खासदार निलेश राणे साहेब यांनीही याबाबत आग्रही भूमिका घेतली होती त्याची परिणीती म्हणजे आजचे एटीएम् सेंटर आहे. आज जिल्हा बँक केंद्रीय मंत्री नाम.श्री. नारायण राणे साहेंबांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या आर्थिक विकासाचे ध्येय्य डोळ्यासमोर ठेऊन विविध उपक्रम राबवित आहे. जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात काम करत असताना बँक हा ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू असून जिल्ह्याची अर्थव्यवस्था गतिशील करण्यासाठी ग्रामीण भागाच्या विकासाचा विचार करावा लागणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले बँकेच्या ग्राहकांना जलद व घरपोच सुविधा डोअर स्टेप बँकींग ची सुविधा देण्याचे धोरण बँकेने आखलेले आहे. बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी हे तुमची चालती फिरती बँकच असणार आहे शिवाय मायक्रो फायनान्स अंतर्गत नाबार्डने मान्यता दिलेले प्रक्रिया उद्योग उभे करण्यासाठी प्रयत्न करुन त्यांना आवश्यक असणारे प्रशिक्षण, बाजारपेठ, मार्गदर्शन, कर्जपुरवठा या सुविधा मागणीनुसार देणार असल्याची ग्वाही मान. श्री. मनीष दळवी यांनी दिली.
कार्यक्रमाच्या वेळी एटीएम सेंटरचे लोकार्पण खासदार निलेश राणे यांनी फित कापून केले तर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी प्रास्ताविक करतानां चौके शाखेच्या व्यवसायाची माहिती दिली व शाखेची हि प्रगती म्हणजे ठेवीदार आणि ग्राहकांनी बँकेवर टाकलेला विश्वास असल्याचे सांगून त्यांचे आभार मानले.
यावेळी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते प्रातिनीधिक स्वरूपात बँकेच्या चार ग्राहकांना एटीएम कार्ड वितरित करण्यात आली. यावेळी जागा मालक विष्णू गावडे यांचा सत्कार खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा बँकेचे संचालक सर्वश्री व्हीक्टर डांटस, संदीप परब, मेघनाथ धुरी, नांदरुख गावचे माजी चे सरपंच रामचंद्र चव्हाण, चौके गावचे सरपंच राजा गावडे, पंचायत समिती सभापती श्रीमती मनीषा वराडकर,आंबेरी विकास सहकारी संस्थेचे चेअरमन कृष्णा करलकर, खरेदी विक्री संघाचे संचालक सुरेश चौकेकर तसेच बँकेचे जागा मालक विष्णू गावडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष गावडे, पत्रकार नितीन गावडे, अशोक सावंत,धोंडी चिंदरकर, जिल्हा बँकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच चौके गावातील ग्रामस्थ, ग्राहक, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.