रत्नागिरी : प्रतिनिधी (योगेश मुळे)
रिमिक्सच्या जमान्यात सध्या शास्त्रीय संगीताकडे वळण्याचा कल कमी आहे. शास्त्रीय संगीत म्हटले की, भल्या पहाटे उठून रियाज करणे आले, रियाजात सातत्य ठेवणे आले. मात्र कमी वयामध्ये आपल्या गुरू मुग्धा भट सामंत यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संगमेश्वरची युवा गायिका निहाली अभय गद्रे हिने शास्त्रीय संगीतातील संगीत अलंकार ही पदवी प्राप्त केली आहे. कमी वयात अलंकार पदवीने सन्मानित होण्याचा पहिला मान निहालीने प्राप्त केल्याने तिच्यावर अभिनंदन कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जाहिरात :