
मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री ‘जुई गडकरी’ हीने आतापर्यंत वेगवेगळया मराठी मालिका तसेच डेब्यू सिरीजमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अशातच जुई गडकरी ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. दरम्यान तिने तिच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती लहान बाळाच्या नामकरण सोहळ्यात सहभागी असल्याची दिसत आहे.

जुईने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये ती बाळाला हातामध्ये घेऊन बसली असल्याचं पाहायला मिळतयं. तर, दुसऱ्या फोटोमध्ये जुई एका ग्रुप फोटोमध्ये दिसत आहे आणि बाळाला तिच्या आईने मांडीवर घेतलं आहे. “राजकुमारीचे नाव प्रचिती” असं गोड कॅप्शन लिहत जुईने ही पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये असणारं बाळ नेमकं कोणाचं आहे हे जुइने गुलदस्त्यात ठेवलं आहे. ती इंस्टाग्रामवर एक एक पोस्ट शेअर करत चहात्यांना अपडेट देत आहे.
जुई गडकरी हि तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सज्ज राहून चाहत्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असते. सोबतच ती तिचे खास अंदाजात फोटो पोस्ट करत असते. जुईने स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमध्ये दमदार अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्या मालिकेमधून जुई घराघरात पोहोचली. त्यानंतर ती आपल्याला इतर मालिकांमध्ये देखील दिसली. दरम्यान जुईने बिग बॉसच घर देखील गाठलं होतं. सध्या जुई ‘ठरलं तर मग’ या मालिकेत कार्यरत आहे. या मालिकेमधील जुईचा प्रेमळ स्वभाव अनेकांना भावतोय.
